गेल्या काही महिन्यांपासून कबड्डी चाहते प्रो कबड्डी लीग स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेचे ८ वे हंगाम येत्या डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी तीन दिवसीय खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. या लिलावात रविंद्र पेहेल यंदा गुजरात फॉर्चूनजायंट्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे.
प्रो कबड्डी स्पर्धेत मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ गुजरात फॉर्चूनजायंट्स संघ यंदा आणखी मजबूत होऊन मैदानात उतरणार आहे. या संघात आता रविंद्र पेहेलची एन्ट्री झाली आहे. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र पेहेलला गुजरात फॉर्चूनजायंट्स संघाने ७४ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. गेली काही वर्ष तो दबंग दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करत होता.(Ravinder pahal will play for Gujarat fortunegiants in upcoming season)
रविंद्र पेहेल हा लेफ्ट कॉर्नर सांभाळतो. त्याचा येण्यामुळे गुजरात फॉर्चूनजायंट्स संघ आणखी मजबूत होईल, यात काहीच शंका नाही. त्याने प्रो कबड्डी स्पर्धेत आतापर्यंत एकूण ८९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने चढाई करताना एकूण १४ गुणांची कमाई केली आहे. तर पकडी करताना त्याने २६३ गुणांची कमाई केली आहे. तसेच १९ गुण हे सुपर टॅकलद्वारे मिळवले आहेत. यासह प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात त्याने सर्वोत्कृष्ट बचावपटू होण्याचा मान पटकावला होता. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत तो रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
अबोजर मिघानीची बंगाल वॉरियर्समध्ये रॉयल एन्ट्री; ‘इतक्या’ लाखांच्या बोलीसह दिले संघात स्थान
दीपक हुड्डाच्या किमतीवर चाहते नाराज, पीकेएल लिलावात केवळ ‘इतक्या’ लाखांची लागली बोली