वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यान सुरू असलेल्या त्रिनिदाद येथील दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने आपली पकड भक्कम केली आहे. चौथ्या दिवशी सुरुवातीला भारतीय संघाच्या गोलंदाजांनी व त्यानंतर फलंदाजांनी शानदार कामगिरी करत, वर्चस्व गाजवले. त्याचवेळी भारतीय संघाची अनुभवी फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडीज संघाचा डाव 255 धावांवर आटोपला. मोहम्मद सिराज याने भारतासाठी सर्वाधिक 5 बळी मिळवले. तर जडेजा व अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत त्याला साथ दिली. त्यानंतर वेस्ट इंडीज संघाच्या दुसऱ्या डावातही अश्विनने दोन बळी मिळवत चांगली सुरुवात केली. वेस्ट इंडीजच्या मॅकेन्झी याला बाद करतात अश्विन व जडेजा या जोडीने एकत्रितपणे कसोटी क्रिकेट खेळताना तब्बल 500 बळींचा टप्पा पूर्ण केला. त्यांच्यापुढे आता केवळ अनिल कुंबळे व हरभजन सिंग हे फिरकीपटू आहेत. त्यांनी एकत्रितपणे 501 एक बळी टिपले सामन्याच्या अखेरच्या दिवशी हा विक्रम देखील आपल्या नावे करण्याची संधी जडेजा व अश्विन यांच्याकडे असेल.
या दोघांनी आतापर्यंत 49 कसोटी सामने एकत्रित खेळताना हा मोठा टप्पा पार केला. यामध्ये अश्विन याने 274 तर जडेजा आणि 226 बळी मिळवले आहेत. दुसरीकडे हरभजन व कुंबळे या जोडीचा विचार केल्यास त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकत्रितपणे 54 कसोटी सामने खेळले होते. तेव्हा कुंबळे 281 बळी घेण्यात यशस्वी ठरलेले. तर, हरभजन याने 220 बळी आपल्या नावे केलेले.
(Ravindra Jadeja And R Ashwin Took 500 Wickets In Test Combine Now Eyeing Kumble Harbhajan Record)
आणखी वाचा:
एशिया कप फायनलमध्ये यंग इंडियावर अन्याय? पंचांनी केल्या दोन अक्षम्य चुका
त्रिनिदाद कसोटीवर भारतीय संघाची मजबूत पकड! चौथा दिवस रोहित-किशनच्या नावे