मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३३ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. डॉ. डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात चेन्नईने अखेरच्या चेंडूवर ३ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात माजी कर्णधार एमएस धोनी याचा मोठा वाटा होता. त्याने अखेरच्या षटकात १६ धावा काढत चेन्नईला विजय मिळवून दिला. यानंतर चेन्नईच्या गोटात आनंदाचे वातावरण होते, तर नवा कर्णधार रविंद्र जडेजा थेट धोनीसमोर नतमस्तक झाला होता.
धोनीचा विजयी चौकार
मुंबईने चेन्नईसमोर (CSK vs MI) १५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईनेही नियमित अंतराने विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १७ धावांची गरज होती. यावेळी चेन्नईकडून एमएस धोनीसह (MS Dhoni) ड्वेन प्रीटोरियस फलंदाजी करत होता, तर मुंबईकडून जयदेव उनाडकट गोलंदाजी करत होता. त्याने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रीटोरियसला बाद करत माघारी धाडले.
त्यामुळे ड्वेन ब्रावो मैदानात आला. त्याने एक धाव काढत धोनीला स्ट्राईक दिली. पुढे धोनीने तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारत १० धावा वसूल केल्या. त्यानंतर ब्रावो आणि त्याने दुहेरी धावा काढल्या. अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना धोनीने चौकार ठोकत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीने १३ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या.
धोनीसमोर जडेजा नतमस्तक
जेव्हा धोनी विजयी चौकार खेचल्यानंतर पॅव्हेलियनकडे परतत होता, त्यावेळी दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करण्यासाठी मैदानात आले. यावेळी जेव्हा जडेजा (Ravindra Jadeja) धोनीसमोर आला, तेव्हा त्याने त्याच्या डोक्यावरची टोपी काढली आणि त्याने कंबरेत वाकून नतमस्तक झाला. नंतर धोनीने त्याची गळाभेट घेतली. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे (Ravindra Jadeja bows down to MS Dhoni).
Nobody finishes cricket matches like him and yet again MS Dhoni 28* (13) shows why he is the best finisher. A four off the final ball to take @ChennaiIPL home.
What a finish! #TATAIPL #MIvCSK pic.twitter.com/oAFOOi5uyJ
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
चेन्नईने जिंकला सामना
या सामन्यात मुंबईने २० षटकांत ७ बाद १५५ धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सूर्यकुमारने ३२ धावा केल्या. तसेच चेन्नईकडून मुकेश चौधरीने १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईकडून अंबाती रायुडूने ४० धावांची आणि रॉबिन उथप्पाने ३० धावांची खेळी केली. तसेच अखेरीस ड्वेन प्रीटोरियसने २२ आणि धोनीने नाबाद २८ धावा करत चेन्नईला विजयापर्यंत पोहचवले. मुंबईकडून डॅनिएल सॅम्सने ४ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा बरोबर २४ वर्षांपूर्वी शारजाहच्या मैदानावर अवतरले होते ‘सचिन’ नावाचे तुफान
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करत चेन्नईची टर उडवणारा ‘हा’ पठ्ठ्या आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर
पराभवातही मुंबईचीच ‘सत्ता!’ आयपीएल इतिहासातील सर्वात लाजीरवाणा विक्रम पाच वेळच्या विजेत्याच्या नावे