भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका बुधवारी (12 जुलै) सुरू होत आहे. उभय संघांतील ही मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची खेळणार आहे. वनडे मालिकेसाठी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरेल, तेव्हा सर्वांची नजर रविचंद्रन अश्विन याच्यावर असेल. कारण अश्विन या मालिकेत मोठा विक्रम नावावर करणार आहे. माजी दिग्गज कपिल देव आणि अनिल कुंबळे हे दोघे त्याच्या निशाण्यावर असतील.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील वडने मालिका 27 जुलै रोजी सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना केविंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या सामन्यातच मोठा विक्रम नावावर करू शकतो. भारतीय संघासाठी वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम माजी दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांच्या नावावर आहे. कपिल देवने वेस्ट इंडीजविरुद्धच्या 42 सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक येतो अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचा. कुबळेंनी वेस्ट इंडीजविरुद्ध 26 सामन्यांमद्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत.
या दोन्ही खेळाडूंनंतर भारताचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे नाव आहे. जडेजाने आतापर्यंत वेस्ट इंडीजविरुद्धच्या 29 सामन्यांमध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत. येत्या सामन्यांमध्ये तो कुंबळे आणि कपिल देव यांनाही मागे टाकणार आहे. जडेजाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जर अवघी एक विकेट घेतली, तरी कुंबळे यांचा विक्रम मोडीत निघणार आहे. सध्या हे दोघेही वेस्ट इंडीजविरुद्ध 41-41 वनडे विकेट्ससह बरोबरीवर आहेत. यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या कपिल देव यांना मागे टाकण्यासाठी जडेजाला अजून चार विकेट्स घ्याव्या लागतील. असे झाले तर जडेजाच्या विकेट्सची संख्या 44 होईल आणि कपिल देव मागे पडतील. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या वनडे मालिकेत जडेजा हा किर्तीमान करून दाखवेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Ravindra Jadeja can break Kapil Dev and Anil Kumble’s record in ODI series against West Indies)
वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
27 जुलै, पहिला वनडे सामना, बारबाडोस
29 जुलै, दुसरा वनडे सामना, बारबाडोस
1 ऑगस्ट, तिसरा वनडे सामना, त्रिनिदाद
महत्वाच्या बातम्या –
KL Rahul । चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! सलामीवीर फलंदाज लवकरच करणार पुनरागमन
चार वर्षानंतर सापडला देवधर ट्रॉफीला मुहूर्त! पश्चिम विभागाच्या संघात महाराष्ट्राचे तीन जण, पाहा संघ