मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून(२६ डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने शानदार झेल घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांची सुरुवात खराब राहिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या १५ षटकातच ३ विकेट्स गमावल्या.
ऑस्ट्रलियाला दुसरा धक्का दिला तो फिरकीपटू आर अश्विनने. अश्विनने या सामन्यातील त्याच्या दुसऱ्याच षटकात मॅथ्यू वेडला जडेजाकरवी झेलबाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले होते.
झाले असे की, १२ व्या षटकात गोलंदाजी करत असलेल्या आर अश्विनच्या चौथ्या चेंडूवर वेडने चौकार मारत त्याची भूमीका स्पष्ट केली. मात्र अश्विनने त्याला पुढच्या चेंडूवर आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. अश्विनने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर वेडने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू उंच उडाला. हे पाहून मिड-विकेटला पळत जाऊन झेप घेत जडेजाने अफलातून झेल घेतला.
यावेळी पदार्पण करणारा शुबमन गिलही झेल पकडण्यासाठी पळत येताना दिसला होता. पण जडेजाने कॉल देत हा त्याचा झेल असल्याचे सांगितले होते.
Almost disaster! But Jadeja held his ground and held the catch! @hcltech | #AUSvIND pic.twitter.com/SUaRT7zQGx
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2020
https://twitter.com/7shivamjaiswal/status/1342631485468073984
यानंतर अश्विनने १५ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा धोकादायक फलंदाज स्टिव्ह स्मिथला शुन्यावर बाद करत मोठा धक्का दिला. स्मिथचा झेल पुजाराने घेतला. १५ षटकानंतर ऑस्ट्रेलियाने ३ बाद ३८ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
IND vs AUS : भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांची ‘सेंच्यूरी’
ऑस्ट्रेलियाची ‘ही’ सुंदर स्पोर्ट्स अँकर आहे विराटची खूप मोठी फॅन; भारतात येऊन खायचेत ‘छोले- भटुरे’
‘भारतीय संघाने क्षेत्ररक्षणावर लक्ष देण्याची आवश्यकता’, माजी दिग्गजाने साधला निशाणा