---Advertisement---

दिस इज सर जडेजा वे! अर्धशतकवीर हमीदला धाडले तंबूत, रहस्यमयी चेंडूवर केले क्लीन बोल्ड

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 8:37 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. लीड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी (२५ ऑगस्ट) इंग्लिश गोलंदाजांचा बोलबाला होता. भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने आक्रमक फलंदाजी करत असलेल्या हसीब हमीदला त्रिफळाचित करत माघारी धाडले आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.

भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भारतीय फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हमिद आणि रॉरी बर्न्सने इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून दिवसाखेर १२० धावा केल्या होत्या. यासह इंग्लंड संघाला ४२ धावांची आघाडी मिळवून दिली होती.

जडेजाने हमिदला असे केले बाद 
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (२६ ऑगस्ट) हमीद आणि रॉरी बर्न्स हे दोघेही इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करून देतील असा अंदाज व्यक्त केला गेला होता. परंतु भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच रॉरी बर्न्सला बाद करत माघारी धाडले. त्यानंतर ६३ वे षटक टाकण्यासाठी विराट कोहलीने जडेजाला गोलंदाजीला बोलवले होते. त्याने षटकातील शेवटच्या चेंडूवर हमीदला हवेत फिरकी घेणारा चेंडू टाकला, जो टप्पा पडताच यष्टीला जाऊन धडकला. हमीदने १९५ चेंडूचा सामना करत ६८ धावांची खेळी केली. तो पूर्णपणे सेट झाला होता. परंतु जडेजाने टाकलेल्या रहस्यमयी चेंडूचा त्याला अंदाज आला नाही आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. (Ravindra Jadeja clean bowled Haseeb hameed,watch video)

टी ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या धावा ३ बाद २९८
दुसऱ्या दिवसाचा (२६ ऑगस्ट) खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंड संघाकडे ४२ धावांची आघाडी होती. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या सलामीवीर फलंदाजांनी एकही फलंदाज बाद न होता १२० धावा केल्या होत्या. परंतु दुसऱ्या दिवशी मोहम्मद शमीने रॉरी बर्न्सला ६१ धावांवर त्रिफळाचित करत माघारी धाडले. त्यानंतर रवींद्र जडेजाने हमीदला देखील ६८ धावांवर त्रिफळाचित करत माघारी धाडले. डेविड मलान हा ७० धावांवर सिराजच्या चेंडूवर झेलबाद झाला. तर जो रूट नाबाद ८० धावांवर फलंदाजी करत आहे. टी ब्रेकपर्यंत इंग्लंड संघाला ३ बाद २९८ धावांपर्यंत मजल मारता आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ENGvIND, 3rd Test, 2nd Day Live: टी ब्रेकपूर्वी सिराजचा इंग्लंडला तिसरा धक्का, मलान ७० धावांवर झेलबाद; यजमानांकडे २२० धावांची आघाडी

हुश्श! संपला जडेजाचा बळींचा दुष्काळ, ४० गडी बाद झाल्यानंतर…

‘विराट-रोहितमध्ये जिंकण्याची जिद्दच दिसली नाही,’ माजी पाकिस्तानी कर्णधाराची बोचरी टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---