हैद्राबाद। कालपासून (6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना काल राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.
तसेच या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात वेस्ट इंडीजचा फलंदाज ब्रेंडन किंगला बाद केले. जडेजाची ही मायदेशातील 250 वी आंतरराष्ट्रीय विकेट ठरली आहे.
त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतात 250 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा केवळ 5 वा गोलंदाज ठरला आहे.
याआधी असा पराक्रम अनिल कुंबळे, हरभजन सिंग, आर अश्विन आणि कपिल देव यांनी केला आहे. विशेष म्हणजे या चारही भारतीय गोलंदाजांनी भारतात 300 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.
जडेजाच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतात खेळताना 105 सामन्यात 250 विकेट्स झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
476 – अनिल कुंबळे
376 – हरभजन सिंग
338 – आर अश्विन
319 – कपिल देव
250 – रविंद्र जडेजा
पाकिस्तानने प्रशिक्षकपदावरुन काढल्यानंतर आता मिकी आर्थर
करणार या संघाला मार्गदर्शन
वाचा- ????https://t.co/KvsgP3dBMs????#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 6, 2019
रिषभ पंतला पुढील धोनी होण्यासाठी १५ वर्षे लागतील- सौरव गांगुली
वाचा- ????https://t.co/suHXcfO5cv????#म #मराठी #INDvWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiBrain— Maha Sports (@Maha_Sports) December 6, 2019






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर