भारतीय संघासाठी बांगलादेशविरुद्ध शुक्रवारी खेललेला सामना जास्त महत्वाचा नव्हता. कारण संघाने आधीच आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. असे असले तरी अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्यासाठी बांगलादेशविरुद्धचा हा सामना महत्वाचा ठरला. जडेजाने आपल्या 200 वनडे विकेट्स पूर्ण केल्याच, पण एका खास विक्रमात कपिल देव यांच्या पावलावर पाऊल टाकले.
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात शमीम हुसेन याला पायचीत पकडले. बांगलादेशच्या डावातील 35व्या षटकात त्याला ही विकेट मिळाली. वनडे क्रिकेटमधील जडेजाची ही 200 वी विकेट होती. अष्टपैलू जडेजा याने फलंदाज म्हणून वनडे क्रिकेटमध्ये 181 सामन्यांमधील 123 जावांमध्ये 2578 धावा केल्या आहेत. माजी दिग्गज कपिल देव यांच्यानंतर जडेजा केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून 2000 धावा आणि गोलंदाजी करताना 200 विकेट्स घेतल्या आहेत. कपिल देव (Kapil Dev) यांनी आपल्या वनडे कारकिर्दीत 225 सामने खेळले. यापैकी 221 सामन्यांमध्ये त्यांना 253 विकेट्स मिळाल्या, तर फलंदाजी करताना 3783 धावा केल्या. (Ravindra Jadeja completed 200 wickets in ODIs.)
The moment when Jadeja completed 200 wickets in ODIs.
– A historic moment….!!!!!!!pic.twitter.com/uv4ulOrYpk
— Johns. (@CricCrazyJohns) September 15, 2023
लनडे क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 200 विकेट्स घेणारे खेळाडू –
1. कपिल देव
2. रविंद्र जडेजा
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश – लिटन दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन, अनमूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
महत्वाच्या बातम्या –
फिल्डर म्हणून रोहितने केला मोठा विक्रम, विराट टॉपर असणाऱ्या खास यादीत मिळवले स्थान
IND vs BAN! रोहितकडे सचिनचा महारेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी, कराव्या लागतील फक्त ‘एवढ्या’ धावा