---Advertisement---

आधी सीएसके अन् आता धोनी! जडेजाचं ‘ते’ वागणं चाहत्यांच्या जिव्हारी

On: शनिवार, जुलै 9, 2022 11:51 AM
Ravindra-jadeja-csk
---Advertisement---

क्रिकेटविश्वात विरद्ध संघाच्या खेळाडूंमध्ये मैदानावर भांडणे होतच राहतात. तर कधीकधी हे भांडण मैदानाच्या पलीकडे देखील कायम राहते. मात्र एकाच संघाच्या दोन खेळाडूंमध्ये वादविवाद जास्त पाहिले जात नाही. मात्र, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यात नक्कीच काहीतरी वाद असल्याचे दिसून येत आहे.

सीएसकेने त्यांच्या अधिकृत अकाउंटवर भारताच्या वेस्टइंडिज दौऱ्यासाठी जडेजाला भारतीय उपकर्णधार नेमल्या गेल्याचे पोस्ट केले होते. मात्र, जडेजाने लगेगच त्याच्या इंस्टाग्रामवरुन २०२१ आणि २०२२ सालचे सीएसकेचे सर्व फोटो हटवले आहेत. तसेच जडेजा धोनीला दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो तर यावर्षी त्याने ते ही केले नाहीये. त्यामुळे सीएसके, धोनी आणि जडेजा यांच्यात नक्कीच काही तरी वाद आहे हे स्पष्टने समजून येत आहे.

(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---