---Advertisement---

IPL 2021: चेन्नईसाठी आनंदाची बातमी; ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला मुंबईत दाखल

On: सोमवार, मार्च 29, 2021 1:30 AM
dhoni csk
---Advertisement---

आयपीएलच्या 14 व्या सत्राला 9 एप्रिल पासून सुरूवात होणार आहे. यामधील चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात सीएसकेचे सर्व खेळाडू आपल्या सराव सत्रात दाखल झाले आहेत. दरम्यान,चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही मुंबईत दाखल झाला आहे.

यावर्षी सिडनी कसोटी सामन्यादरम्यान रवींद्र जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया देखील केली होती. दुखापत झाल्यानंतर बरेच दिवस तो क्रिकेटपासून दूर होता. इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकांनाही त्याला मुकावे लागले होते. मात्र आता तंदुरुस्त होऊन तो सीएसकेच्या संघात दाखल होण्यास सज्ज झाला आहे.

तरी रवींद्र जडेजाला देखील दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये 7 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांच्या म्हणण्यानुसार रवींद्र जडेजा चांगली खेळी करताना दिसला आहे. पहिल्या सामन्यामध्ये खेळण्याबाबतही त्यांना पूर्ण विश्वास आहे. सध्या मुंबईत असलेल्या सीएसकेच्या शिबिरात जाण्यापूर्वी तो बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट मैदानामध्ये सराव करतानाही दिसला होता.

त्याबरोबरच सीएसकेच्या इतर खेळाडूंसह सुरेश रैनानेही मुंबई गाठली आहे. वैयक्तिक कारणास्तव तो मागील वर्षी आयपीएल खेळू शकला नव्हता. त्यानंतर आता 24 मार्च रोजी तो मुंबईत आला आहे. पण सध्या तो देखील क्वारंटाईनमध्ये आहे. त्याच्यासह फाफ डू प्लेसिस देखील मुंबईत आला असून तो सुद्धा क्वारंटाईनमध्ये आहे. ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे खेळाडू  बायोबबलमध्ये असलेल्या संघातील इतर खेळाडूंमध्ये सामील होतील.

चेन्नईची मोहिम मुंबईतून 

आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिले पाच सामने चेन्नई सुपर किंग्स मुंबईत खेळणार आहे. यानंतर पुढील 4 सामने दिल्ली येथे खेळले जातील. नंतरचे तीन सामने बंगळुरूमध्ये खेळावयाचे आहेत. याशिवाय कोलकाता येथे सीएसकेला दोन सामने खेळायचे आहेत.

जडेजा होऊ शकतो नवा उपकर्णधार

आयपीएलच्या या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जचा उपकर्णधार कोण असेल असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. कारण मागील हंगामापर्यंत सुरेश रैनाला उपकर्णधारपदाची भूमिका देण्यात आली होती, पण यावेळी रवींद्र जडेजाच्या उपकर्णधारपदाची भूमीका निभावू शकतो, अशी चर्चा आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरेश रैनाला अद्याप त्यांचे जुने पद मिळालेले नाही. परंतु लवकरच ते त्यांच्या उपकर्णधाराची घोषणा करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘ही’ गोष्ट घडली म्हणून जोफ्रा आर्चरने आयपीएलमधून घेतली माघार; वाचा काय आहे कारण

आयपीएल स्पर्धेनंतर ‘या’ देशामध्येही एबी डिविलियर्सची पाहायला मिळणार चौफेर फटकेबाजी

हार्दिक पंड्याचा कहर!!! मोईन अलीच्या एकाच षटकात लगावले ३ गगन चुंबी षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---