भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका झाली. या मालिकेच्या सुरुवातीलाच इंग्लंड संघाचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे माघार घेतली होती. तसेच त्याने आगामी आयपीएल २०२१ हंगामातूनही माघार घेतली आहे. आता त्याच्या दुखापतीमागचे खरे कारण समोर आले आहे.
इंग्लंड संघ जानेवारी महिन्यापासून भारतीय दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर त्यांनी ४ कसोटी सामने, ५ टी२० सामने आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली आहे. या दौऱ्यावर येण्यापूर्वीच घरगुती काम करत असताना जोफ्रा आर्चरचा हात कापला गेला होता. तरी देखील कसोटी मालिका आणि टी२० मालिकेसाठी त्याने खेळली होती. त्याच्या दुखापतीवर इंग्लंडच्या मेडिकल टीमने लक्ष ठेवले होते. परंतु, दुखापतीचा त्रास वाढू लागल्याने त्याने वनडे मालिकेतून माघार घ्यायचे ठरवले होते.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ब्रिटनमध्ये परतल्यानंतर जोफ्रा आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपरात झालेल्या दुखापतीचा आढावा घेण्यासाठी स्कॅन घेण्यात आला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. त्याला कोपरात वेदना जाणवत होती ते कमी करण्यासाठी त्याला इंजेक्शन्सदेखील देण्यात आले होते.
शस्त्रक्रिया आणि कोपरात होणाऱ्या दुखापतीमुळे तो आयपीएल स्पर्धेला देखील मुकणार आहे. त्यामुळे आर्चर संघाबाहेर असल्याचा फटका राजस्थान रॉयल्स संघाला बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल स्पर्धेनंतर ‘या’ देशामध्येही एबी डिविलियर्सची पाहायला मिळणार चौफेर फटकेबाजी
हार्दिक पंड्याचा कहर!!! मोईन अलीच्या एकाच षटकात लगावले ३ गगन चुंबी षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत-इंग्लंड वनडे मालिकेत पडला षटकारांचा पाऊस; तीन सामन्यात मारले ‘इतके’ विश्वविक्रमी षटकार





