चेन्नई सुपर किंग्सनं शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात एक नवा प्रयोग केला. चेन्नईचे दोन गडी लवकर बाद झाले होते. त्यानंतर संघानं अष्टपैलू रवींद्र जडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं. रवींद्र जडेजानंही त्याला सोपवलेलं काम चोख पार पाडलं आणि संघाला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढलं.
लखनऊविरुद्ध चेन्नईनं 33 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर संघ व्यवस्थापनानं रवींद्र जडेजाला बढती दिली. गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या या विकेटवर एका टोकावरून धावगती राखण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली होती. रवींद्र जडेजानं हे काम चोख पार पाडत 34 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्यानं आपलं अनोखं तलवारबाजीचं सेलिब्रेशनही केलं.
A crucial half-century from Ravindra Jadeja!
..And he brings out his trademark fifty celebration 😎
Follow the Match ▶️ https://t.co/PpXrbLNaDm#TATAIPL | #LSGvCSK | @imjadeja | @ChennaiIPL pic.twitter.com/NlwVYvCJwR
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2024
जडेजा 40 चेंडूत 57 धावा करून नाबाद राहिला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीनंही मोलाचं योगदान दिलं. धोनी आणि जडेजा यांच्यात 35 धावांची भागीदारी झाली, ज्यापैकी महेंद्रसिंह धोनीनं 28 धावा केल्या. धोनीनं केवळ 9 चेंडूंचा सामना केला. जर धोनीची ही खेळी आली नसती तर संघ 160 धावांच्या आसपासच पोहचू शकला असता. मात्र त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं निर्धारित 20 षटकांत 176 धावा केल्या.
रवींद्र जडेजानं टी20 क्रिकेटमध्ये क्वचितच चौथ्या क्रमांकावर किंवा त्याहून वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. मात्र आज त्यानं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन आयपीएलमधील आपलं केवळ तिसरं अर्धशतक पूर्ण केलं. जडेजा सहसा 6 ते 8व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्यामुळे त्याला धावा काढण्यासाठी फार कमी संधी मिळते. त्यांला शेवटच्या षटकांमध्ये काहीच चेंडू खेळायला मिळतात, ज्यामध्ये त्याच्यावर जास्तीत ज्यात धावा काढण्याची जबाबदारी असते.
आजच्या सामन्यात परिस्थिती वेगळी होती. जडेजाला आपली विकेट राखून धावा बनवायच्या होत्या, जे त्यानं उत्तमपणे पार पाडलं. त्यानं अखेरपर्यंत नाबाद राहून चेन्नईला एक मजबूत धावसंख्या उभारून दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
लखनऊमध्ये जिकडे-तिकडे फक्त धोनीचेच फॅन्स!…दीपक चहरही हैराण, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
मोहिसनचा ऑर्कर अन् रवींद्र चारी मुंड्या चित! पहिल्याच चेंडूवर पकडला पॅव्हेलियनचा रस्ता; पाहा VIDEO
पंजाब किंग्जचं नशीबच फुटकं! शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत गमावले 4 सामने