भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. यादरम्यान तो जामनगर येथील आपल्या घरी राहुन सुट्टी घालवत असून सातत्याने तो सोशल मीडियावर आपल्या घरातील छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतोय. अत्यंत शाही अंदाजातील त्याच्या या घराविषयी आज आपण जाणून घेऊया.
जडेजाचा शाही बंगला
जडेजा सध्या जामनगर या आपल्या शहरातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. आपल्या प्रसिद्धी प्रमाणेच त्याने आपल्या घराचे रुप शाही बनवले आहे.
https://www.instagram.com/p/B_cLLPul_QM/
जामनगरमध्ये जडेजाने चार मजली बंगला बांधला असून त्याला ‘क्रिकेट बंगला’ असे म्हटले जाते. बंगल्याच्या बाहेरील बाजू ही एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे. बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे अत्यंत विशाल दिसून येते.
https://www.instagram.com/p/B4rpVyIlyWv/
जडेजाच्या या बंगल्यामध्ये एकाहून एक सुंदर शोपीस व झुंबरे आहेत व अशा प्रकारच्या विविध शोपीसने त्याने बंगल्याच्या आतमधील खोल्यांची सजावट केली आहे. त्याच्या दिवाणखान्यात एक अत्यंत महागडा व शाही सोफा असून तो अनेकदा त्यावर बसून छायाचित्रे टिपत असतो. त्याच्या घरातील डिनर व्यवस्थादेखील एखाद्या राजाप्रमाणे दिसते.
https://www.instagram.com/p/B4J_esiFDU_/
जडेजाने जामनगरमध्येच आपल्या नावाने ‘मिस्टर जड्डू’ नावाचे फार्महाउस बांधले आहे. ज्यामध्ये तो तलवारबाजी घोडेस्वारी करताना दिसत असतो.
https://www.instagram.com/p/CAIW_2zF3r1/
प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आला जडेजा
रवींद्र जडेजा हा भारतीय क्रिकेटमधील त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्याने लहानपणी अत्यंत गरीबीत दिवस काढले होते. त्याचे वडील हे रखवालदार म्हणून काम करत. २००८ मध्ये भारताच्या युवा संघासोबत विश्वचषक जिंकल्यानंतर व आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली होती.
https://www.instagram.com/p/BptXN8nHotU/
त्यानंतर जडेजाने मागे वळून न पाहता यशाची शिखरे पादाक्रांत केली. तो काही काळ कसोटी क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज व अष्टपैलू होता. सध्या तो भारताचा प्रमुख फिरकी अष्टपैलू म्हणून ओळखला जातो.
महत्त्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारच्या नावे जमा झाला खास विक्रम; रोहित-रहाणेच्या पंक्तीत मिळवले स्थान
‘त्या’ खेळाडूचे पुनरागमन होताच भारतीय संघ आणखी मजबूत होईल, बॉलिवूड अभिनेत्याचा दावा