रविंद्र जडेजा याने विजयी चौकार मारून चेन्नई सुपर किंग्जला आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली. एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेला विजयासाठी 15 षटकांमध्ये 171 धावा हव्या होत्या. शेवटच्या चेंडूवर चौकार मारून जडेजानेच संघाला विजय मिलवून दिला. दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी जडेजाची पत्नी आणि मुलगी मैदानात आले होते. विजयानंतर जडेजाने पत्नी रिवाबाला मिठी मारल्याचेही पाहयला मिळाले.
रविंद्र जडेजा () आयपीएल 2023च्या या अंतिम सामन्यात अवघे 6 चेंडू खेळला. पण यातच त्याने धुमाकूळ घातला. त्याने नाबाद 15 धावांचे योगदान संघासाठी दिले. सीएसकेला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूवर 10 धावा हव्या होत्या. अशा परिस्थितीत जडेजाने लागोपाठ षटकार आणि चौकार मारले आणि संघाला विजय मिळवून दिला. विजयानंतर जडेजाकच्या दिशेने सीएसकेच्या डगआउटमधील जवळपास सर्वजण मैदानात धावत आले.
सीएसकेसाठी आयपीएल इतिहासातील हा पाचवी ट्रॉफी ठरली. या ऐतिहासिक सामन्याची साक्षीदार म्हणून जडेजाची पत्नी रिवाबा आणि त्याची मुगली देखील उपस्थित होत्या. सामना संपल्यानंतर सीएसकेचा प्रत्येक खेळाडू आपले सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवत होता. अशात जडेजाने रिवाबाला मिठी मारल्याचे पाहायला मिळाले. दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, रिवाबा जडेजाने डिसेंबर 2022मध्ये पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडून आली आहे. जामनगर उत्तर या मतदारसंघाची ती सध्या आमदार देखील आहे.
CSK ???? ko champion ???? banane wale Sir ravindra jadeja with his wife #IPL2023Finals #RavindraJadeja pic.twitter.com/MPVgaAPh5c
— Keshav Nagar (@keshavnagarncc) May 29, 2023
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 4 बाद 214 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसकेचे फलंदाज खेळपट्टीवर आले. पण काही चेंडूंनंतर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे सामना पुन्हा सुरू व्हायला रात्री 12.10 वाजले. असात पंचांना डकवर्थ लुईस नियमानुसार सीएसकेला विजयासाठी 15 षटकांमध्ये 171 धावांचे लक्ष्य दिले. (Ravindra Jadeja hugs his wife Rivaba in Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘एकच वादा धोनी दादा, गुजरातला घरात घुसून…’, धोनीच्या CSKने ट्रॉफी जिंकताच केदार जाधव भलताच खुश
अखेर धोनीने IPL निवृत्तीवर मौन सोडलेच; 142 कोटी भारतीयांना अपेक्षित होतं, तेच बोलला ‘माही’, लगेच पाहा