भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा हा सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. आशिया चषकात झालेल्या दुखापतीमुळे तो टी20 विश्वचषकातही सहभागी होऊ शकला नव्हता. त्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावर देखील तो संघाचा भाग असणार नाही. या सर्व घडामोडी घडत असतानाच तो आता वादात सापडला आहे.
पुढील महिन्यात गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जडेजाची पत्नी रिवाबा सोलंकी ही भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर जामनगर येथून आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. आपल्या पत्नीच्या प्रचारात जडेजा कोठेही कसूर ठेवत नाही. मात्र, याच प्रचार काळात व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे जडेजावर टीका होताना दिसतेय.
जडेजा 22 नोव्हेंबर रोजी आपल्या पत्नीच्या प्रचारार्थ जामनगर येथे रोडशो करताना दिसून आला होता. या रोड शोला नागरिकांची चांगलीच गर्दी झालेली. मात्र, या रोड शोची माहिती देणारे जे पत्रक छापले गेलेले त्यावर जडेजाचा भारतीय संघाच्या जर्सीतील फोटो छापला गेलेला. आता याच फोटोवर विरोधी पक्ष आम आदमी पार्टीने आक्षेप घेतला आहे.
आम आदमी पार्टीचे दिल्ली येथील आमदार नरेश बलयान यांनी ते पोस्टर ट्विट करत लिहिले,
कल तक खिलाड़ी राजनीति से अलग थे। अब खुले आम राजनीति कर रहे हैं। भाजपा ने किसी भी संस्था को बर्बाद करने में नही छोड़ा। https://t.co/vDfVEYrUAu
— Naresh Balyan (@AAPNareshBalyan) November 23, 2022
‘कालपर्यंत खेळाडू राजकारणापासून अलिप्त होते. आता खेळाडू थेट राजकारणात उतरलेत. भाजपने कोणतीच संस्था बरबाद करायची ठेवली नाही.’
जडेजाची पत्नी रिवाबा ही राजकारणी घराण्याची संबंधित आहे. तिने यापूर्वी देखील 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी तिला यश आले नव्हते. जडेजाची पत्नी एकीकडे भाजपची उमेदवार असताना त्याची सख्खी बहिण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची प्रचारक आहे.
(Ravindra Jadeja In Trouble For Promoting BJP In Indian Jersey)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पहिल्या वनडेत धावांचा पाऊस, किवींकडून भारताचा धक्कादायक पराभव, फलंदाजांनी कमावलं पण गोलंदाजांनी गमावलं
दिग्गज इंग्लिश क्रिकेटपटू बनला बाप, लग्नाआधीच चाहत्यांना दिली आनंदाची बातमी