---Advertisement---

धोनीने तब्बल १२ वर्षे पंजाबविरुद्ध न केलेला तो नकोसा विक्रम जडेजाने तिसऱ्याच सामन्यात केला

On: सोमवार, एप्रिल 4, 2022 12:47 PM
MS-Dhoni-and-Ravindra-Jadeja
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स संघासाठी इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाची सुरुवात खराब झाली असून संघाला पहिल्या तिन्ही सामन्यांत अपयश आले आहे. तिसऱ्या सामन्यात सीएसकेला पंजाबने ५४ धावांनी पराभूत केले. यावर्षी सीएकेचे नेतृत्व रविंद्र जडेजा करताना दिसत आहे. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद २६, तर दूसऱ्या सामन्यात १७ धावांची खेळी खेळली. परंतु, त्याला पंजाबविरुद्धच्या सामन्यात एकही धाव करता आली नाही तो शून्यावरच बाद झाला. 

जडेजा जेव्हा मैदानात फलंदाजी उतरला तेव्हा सीएसके संघाला त्याच्या उत्तम खेळीचा गरज होती. परंतु, त्याने एकही धाव न करता तंबू गाठला. त्याला पंजाबच्या अर्शदीप सिंगने बाद केले. जडेजाने आपल्या डावात केवळ तीन चेंडूंचा सामना केला. शून्यावर बाद होण्याबरोबरच त्याने नकोसा वाटणारा विक्रम आपल्या नावे केला आहे.

मागील १२ हंगामात सीएसके संघाचा कर्णधार एमएस धोनी होता. तो पंजाब किंग्सविरुद्ध एकदाही शून्यावर बाद झाला नाही. मात्र आपला १३ वी आयपीएल खेळत असलेल्या सीएसके संघाचे कर्णधारपद रविंद्र जडेजाला देण्यात आले आणि तो तिसऱ्याच सामन्यात शून्यावर बाद झाला.

जडेजा सीएसकेचा पहिला कर्णधार बनला आहे, जो पंजाबविरुद्ध शून्यावर बाद झाला. आयपीएलमध्ये सीएसके संघासाठी सुरेश रैनाने काही सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. परंतु, तो सुद्धा पंजाब संघाविरुद्ध शून्यावर बाद झाला नाही.

पंजाबविरुद्ध जडेजाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबने २० षटकात ८ विकेट्स गमावत १८० धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने ६० धावा, तर शिखर धवनने ३३ धावा केल्या. सीएसकेची सुरुवात खूप खराब झाली. संघाने ६ षटकातच ४ विकेट्स गमावत २७ धावा केल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये ऋतुराज गायकवाड १ धाव, राॅबिन उथप्पा १३ धावा, तर मोईन अली आणि रविंद्र जडेजा शून्यावर बाद झाले. सीएसके संघाने ३६ धावांवरच ५ विकेट्स गमावल्या. पाचवी विकेट अंबाती रायुडूची होती, जो १३ धावा करुन बाद झाला. सीएसके १२६ धावांवरच सर्वबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

एकदाच खेळले पण टिच्चून खेळले! आयपीएल इतिहासातील केवळ एक सामना गाजवणारे भारतीय खेळाडू

काय सांगता! गिलख्रिस्टने संपूर्ण कारकिर्दीत घेतली एकच विकेट, तीही आयपीएलमध्ये, ‘हा’ खेळाडू ठरला होता बळी

आयपीएल अपडेट | आरसीबीच्या ताफ्यात नव्या शिलेदाराची एन्ट्री, टी२०त खोऱ्याने ओढतो धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---