इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे बिगूल वाजले असून अवघ्या २ दिवसांमध्ये आयपीएलची सुरुवात होणार आहे. २६ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी रविंद्र जडेजाबद्दल मोठी बातमी पुढे येत आहे. तब्बल १२ वर्षे सीएसकेचे नेतृत्त्व करणाऱ्या एमएस धोनीने संघाचे नेतृत्त्वपद अष्टपैलू जडेजाकडे सोपवले आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या येत्या सामन्यांमध्ये सीएसकेचे नेतृत्त्व करताना दिसेल.
जडेजाला (Ravindra Jadeja) हे पद मिळवण्यासाठी मोठी तपश्चर्या करावी लागली आहे. त्याने जवळपास गेली १४ वर्षे खेळाडू म्हणून आयपीएल खेळल्यानंतर आता त्याला बढती मिळाली (Ravindra Jadeja CSK Captaincy) आहे.
जडेजाने २००८ साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो कोची टस्कर्स केरला संघाचाही भाग राहिला होता. मात्र २०१२ मध्ये धोनीच्या (MS Dhoni) सीएसकेची (Chennai Super Kings) त्याच्यावर नजर पडली आणि तो या संघाचा भाग बनला. २०१२ पासून तो सीएसकेचे प्रतिनिधित्व करतो आहे. आतापर्यंत जडेजाने खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये तब्बल २०० सामने (Most IPL Matches Without Captaining Team) खेळले आहेत. त्यानंतर आता जडेजाला सीएसकेच्या कर्णधाररूपी त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे.
याखेरीज तब्बल २७७ टी२० सामने खेळल्यानंतर जडेजाला या स्वरूपात नेतृत्त्वपद मिळाले आहे. टी२० कर्णधारपद मिळण्यासाठी कोणत्या खेळाडूला सर्वाधिक प्रतिक्षा करावी लागणारा जडेजा पहिलाच खेळाडू आहे.
संघाचे नेतृत्व न करता सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारे क्रिकेटपटू:
२००- रवींद्र जडेजा
१९३ – रॉबिन उथप्पा
१८४- एबी डिव्हिलियर्स
१७५- अंबाती रायुडू
१७४- युसूफ पठाण
हेही वाचा- चॅम्पियन ‘थाला’ | आयपीएलमध्ये धोनी म्हणजे कॅरम खेळताना नेहमी राणीचा विचार करणारा ‘मामू’
सीएसकेची पहिली निवड होता रविंद्र जडेजा
सीएसकेने आयपीएल २०२२ साठी लिलावाआधी ४ खेळाडूंना संघात कायम केले होता. यामध्ये एमएस धोनीबरोबर रविंद्र जडेजा आणि मागील हंगामात संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऋतुराज गायकवाड या भारतीय खेळाडूंचा समावेश होता. तसेच परदेशी खेळाडूच्या रूपात सीएसकेने मोईन अलीला संघात कायम केले होते.
या खेळाडूंची निवड करताना सर्वप्रथम सीएसकेने जडेजाला निवडले होते. त्याच्यासाठी सीएसकेने १६ कोटी रुपये मोजले होते. त्यानंतर चेन्नईने धोनी, मोईन अली आणि ऋतुराज यांची निवड केली होती. त्यांच्यासाठी अनुक्रमे १२ कोटी, ८ कोटी आणि ६ कोटी रुपये मोजले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन ‘थाला’ | आयपीएलमध्ये धोनी म्हणजे कॅरम खेळताना नेहमी राणीचा विचार करणारा ‘मामू’
आयपीएल २०२१मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या उमरान मलिकला विराटने काय दिलेला सल्ला, वाचा