आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. सर्व संघ आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करत आहेत. मागच्या वर्षी गुणतालिकेत सर्वात खराब प्रदर्शन करणारा सनरायझर्स हैदराबाद संघही आगामी हंगामासाठी तयार आहे आणि संघातील खेळाडू सराव करत आहेत. सनरायझर्सचे प्रदर्शन मागच्या हंगामात खराब राहिले असले, तरी त्यांचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, ते पाहून प्रत्येकजण हैराण होता. दिग्गज विराट कोहलीनेही उमरानच्या गोलंदाजीची दखल घेत त्याला काही सल्ले दिले होते.
भारताचा २२ वर्षीय युवा गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याची मागच्या हंगामातील अप्रतिम गोलंदाजी पाहून सनरायझर्स हैदराबातने त्याला संघात रिटने केले. त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे फलंदाजांची चांगलीच फजिती झाली होती. मागच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडूही त्यानेच टाकला होता.
उमरानव्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydarabad) संघाने केन विलियम्सन (Kane Williamson) आणि अब्दुल समद (Abdul Samad) यांना संघात रिटेन केले. आयपीएल २०२२ दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) झालेल्या चर्चेचा खुलासा उमरानने आता केला आहे.
माध्यमांशी बोलताना उमरान मलिक म्हणाला, “विराट कोहलीने माझ्यासोबत चर्चा केली आणि मला माझी गोलंदाजी आणि फिटनेसवर काम करायला सांगितले. त्याने मला मेहनत घ्यायला सांगितले. विराट मला म्हणाला की, जर एवढं सगळं करत आहेस, तर भारतीय संघाची कॅप खूप लांब नाहीय. वेळ आल्यावर संधी मिळेल.” द
रम्यान, मागच्या आयपीएल हंगामातील उमरानचे प्रदर्शन पाहिल्यानंतर त्याला टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाच्या नेट गोलंदाजाच्या रूपात संधी दिली गेली होती. त्याचे चांगले प्रदर्शन कायम राहिल्यास लवकरच त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधीही मिळू शकते.
आयपीएल २०२२ पूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघातील काही महत्वाचे खेळाडू संघातून बाहेर पडले आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर (David Warner) त्याची जुनी फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्समध्ये सहभागी झाला आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) गुजरात टायटन्स संघात सहभागी झाला आहे. तसेच दक्षिण अफ्रिकी वेगवान गोलंदाज डेस स्टेन आगामी हंगामासाठी सनरायझर्सचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक बनला आहे.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 | ‘या’ ५ गोलंदाजांवर असेल सर्वांचे लक्ष, एका षटकात पालटू शकतात सामन्याचे चित्र