---Advertisement---

लो जी हम आ गए! ‘यलो आर्मी’सोबत जोडला गेला जडेजा, सीएसकेने शेअर केला आगमनाचा Video

On: बुधवार, मार्च 16, 2022 7:16 PM
Jadeja-Joins-CSK
---Advertisement---

आयपीएलचा १५ (IPL 2022) वा हंगाम २६ मार्चपासून सुरु होत आहे. या मोसमापुर्वी खेळाडू आपल्या फ्रॅंचायझीसोबत जोडले गेले आहेत. मंंगळवारी (१५ मार्च) रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह मुंबई फ्रॅंचायझीसोबत जोडले गेले आहेत तर भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्ससोबत (CSK) जोडला गेला आहे. सीएसके संघ सध्या सुरतमध्ये आयपीएलची तयारी करत आहे. सीएसके फ्रॅंचायझीने जडेजाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यातून सांगितले गेले आहे की जड्डू संघासोबत हाॅटेलमध्ये पोहोचला आहे. मोहाली कसोटीतील शानदार खेळीनंतर कपिल देवने जडेजाचे कौतुक केले होते.

सीएसकेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जडेजाने काळा शर्ट आणि जिन्स घातलेली दिसत आहे, तसेच त्याने कॅपसुद्धा घातलेली दिसत आहे. सीएसके फ्रॅंचायझीने जडेजाला १६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीनंतर तो यल्लो आर्मीसोबत जोडला गेला आहे.

३३ वर्षीय जडेजाने मोहाली कसोटीत शानदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात १७५ धावा केल्या आहेत. त्याने मालिकेत सर्वाधिक २०१ धावा केल्या आहेत. याशिवाय जडेजाने गोलंदाजीत देखील उत्तम कामगिरी करत १० विकेट्स घेतल्या आहेत.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1503700575049089025

गेल्या काही काळात जडेजाने अष्टपैलू म्हणून उत्तम कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याचे दिग्गजांकडून कौतुक केले जात आहे. जडेजा गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाशिवाय गोलंदाजीत सुद्धा सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांनी त्याची प्रशंसा केली आहे.

तो म्हणाले की, “नव्या खेळाडूंमध्ये मला रविंद्र जडेजाचा खेळ आवडला आहे, कारण तो कोणत्याही दबावाशिवाय खेळतो. तो खेळाचा आनंद घेतो. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत उत्तम खेळी करत आहे. तो क्षेत्ररक्षण सुद्धा शानदार करतो. मला वाटते की जेव्हा तुम्ही दबावात असता तेव्हा काहीच करु शकत नाही. जर तुम्ही क्रिकेट मैदानात दबाव घेतला तर त्याचा परिणाम तुमच्या खेळीवर होतो.”

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंकेविरुद्ध विकेट्सचा पंचक घेणाऱ्या बुमराहला मोठा फायदा, कसोटी क्रमवारीत टॉप-५ मध्ये; पाहा स्थान

Video: झेल घेतल्यावर क्षेत्ररक्षकासमोर विकेटकिपरने जोडले हात, असं सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं नसेल

क्षणिक सुख! रविंद्र जडेजाने गमावला ‘नंबर १’चा ताज, ‘या’ धाकड अष्टपैलूची अव्वलस्थानी उडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---