यंदाच्या आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होईल. त्यासाठी एक-एक करून सर्व खेळाडू आपापल्या संघात सामील होत आहेत. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील संघात सामील झाला आहे. त्याने आयपीएल 2025ची तयारी सुरू केली आहे. सीएसकेच्या कॅम्पमध्ये सामील झाल्यानंतर, जडेजाने एमएस धोनी (MS Dhoni) आणि रविचंद्रन अश्विन (R Ashwin) यांच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जडेजा म्हणाला, “घरी परत आल्यावर खूप छान वाटतंय. मी संघात सामील होण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी थालाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. थाला बॉस. अश्विन देखील संघाचा एक भाग आहे आणि मला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते. ते काय विचार करत आहेत आणि त्यांच्या खेळाकडे त्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच मी नेहमी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मी त्याच्याकडून काही टिप्स घेण्याचा प्रयत्न करत राहतो. त्याला गोलंदाजी जोडीदार म्हणून मिळणे खूप छान आहे.”
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) रविवारी (23 मार्च) आयपीएल 2025 मध्ये त्यांच्या मोहिमेला सुरुवात करेल. चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. (CSK vs MI) याचा अर्थ चाहत्यांना एक हायव्होल्टेज सामना पाहायला मिळेल. यावेळीही चेन्नईकडे अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात रूतुराज गाकवा़डच्या नेतृत्वाखाली चेन्नई कशी कामगिरी करेल? हे पाहणेदेखील उत्सुकतेचं ठरेल.