अफगाणिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेत शानदार खेळ दाखवून सुपर 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या संघाने स्पर्धेतील सलग दोन सामने जिंकून ही कामगिरी केली. पहिल्या सामन्यात श्रीलंका आणि नंतर अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला. आता हा संघ सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तानसाठी धोका बनू शकतो. माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने स्पष्टपणे सांगितले की, त्याने कोणत्याही मोठ्या संघाला हरवले तर त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही.
What a win! 🙌
Things went right down to the wire but AfghanAtalan led by the Zadran duo of @iamnajibzadran 43* (17) & @IZadran18 42* (41) hold their nerve to beat @BCBtigers by 7 wickets 👏🔥
With this win, we are into the top four teams 🏆🏏#AfghanAtalan | #AsiaCup2022 pic.twitter.com/vkO8xaD2jL
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 30, 2022
जडेजा क्रिकबझवर म्हणाला की, “जेव्हा बाकीचे संघ सुपर 4 मध्ये या संघाविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरतील आणि जर त्यांनी एखाद्या बलाढ्य संघाला मात दिली तर, मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.” तो पुढे म्हणाला की अफगाणिस्तानमध्ये असे गोलंदाज आहेत जे तुम्हाला अडचणीत आणू शकतात. पकड बसल्यावर स्क्रू कसे घट्ट करायचे ते जाणून आहेत. त्यांच्या आत ती आग आहे, प्रत्येकाला बॉलिंगमध्ये काय करायचं हे चांगलं माहीत आहे. आता विचार करा आणि बघा की भारत किंवा पाकिस्तानचा संघ 20 रन्सवर 2 विकेट गमावतो किंवा 30 रन्सवर 2 विकेट गमावतो, तर ते तुम्हाला पुनरागमन करेल. पण अफगाणिस्तान तसं करण्याची संधी देणार नाही. त्यांच्यात ती क्षमता आहे. इतकंच नाही तर, फलंदाजीतही त्यांनी दाखवून दिले आहे की त्यांचे सलामीवीर एका विशिष्ट पद्धतीने फलंदाजी करू शकतात.”
दरम्यान, मंगळवारी (31 ऑगस्ट) भारतीय संघ हाँगकाँग विरुद्ध आशिया चषकातील दुसरा आणि लीग स्थरावरील शेवटचा सामना खेळणार आहे. भारताला सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे. शिवाय हाँगकाँग संघाचे मागील काही सामने पाहिल्यास हा संघ भारताला टक्कर देऊ शकतो. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup | कॅप्टन कूलपेक्षा हिटमॅन ठरणार वरचढं! फक्त करावे लागणर ‘हे’ सोपे काम
‘बाप्पां’च्या भक्तीत तल्लीन झाला डेविड वॉर्नर, खास पोस्टसह जिंकली कोट्यवधी भारतीयांची मने
हाँगकाँगला भिडण्याआधी भारतीय खेळाडूंची खास समुद्रीसफर, फोटो एकदा बघाच