भारतातील मुंबई, पुण्याच्या मैदानांवर सध्या आयपीएल २०२२चे सामने खेळले जात आहेत. शनिवारी (०९ एप्रिल) या हंगामातील तिसरी डबल हेडर खेळवली गेली. यातील पहिला सामना मुंबईच्या डॉ डी वाय पाटील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. हंगामातील या सतराव्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा याने मोठा विक्रम केला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजी निवडली होती. त्यामुळे चेन्नईचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. अशात मैदानावर पाऊल ठेवताच जडेजाने खास दीडशतक (Ravindra Jadeja’s 150th Match For CSK) केले आहे. हा सामना चेन्नई संघाकडून त्याचा आयपीएल कारकिर्दीतील १५० वा सामना होता. यासह तो चेन्नईकडून १५० सामने खेळणारा केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे.
जडेजाने (Ravindra Jadeja) २०१२ साली चेन्नई संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने चेन्नईकडून आयपीएलमध्ये १३६ सामने आणि चँपियन्स लीगमध्ये १४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २६.७१ च्या सरासरीने १५२३ धावा फटकावल्या आहेत. तसेच ११० विकेट्सही घेतल्या आहेत.
जडेजापूर्वी एमएस धोनी आणि चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना यांनी हा पराक्रम केला आहे. हैदराबादविरुद्ध धोनीचा हा चेन्नईकडून २१८ वा सामना होता. तर रैनाने चेन्नईकडून २०० सामने खेळले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू (Most Matches For CSK)
२१८ – एमएस धोनी
२००- सुरेश रैना
१५० – रविंद्र जडेजा*
१२४ – ड्वेन ब्रावो
१२१- आर अश्विन
असे आहेत ११ जणांचे संघ –
चेन्नई सुपर किंग्स – रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महिश तिक्षणा, मुकेश चौधरी
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विलियम्सन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सेन, उमरान मलिक, टी नटराजन
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे गुजरात टायटन्सकडून पदार्पण करणारा साई सुदर्शन, ज्याचे आर अश्विननेही केले होते तोंडभरून कौतुक