---Advertisement---

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ‘ती’ गोष्ट महागात पडली, सीएसकेचा नव्या कर्णधाराचे स्पष्टीकरण

On: रविवार, मार्च 27, 2022 5:20 PM
MS-Dhoni-and-Ravindra-Jadeja
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला शनिवारी (२६ मार्च) सुरुवात झाली. हंगामातील पहिला साममा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली. मात्र, चेन्नई सुपर किंग्सला त्यांचा नवा कर्णधार रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. या पराभवाचे कारण जडेजाने सामन्यानंतर स्पष्ट केले आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी केली. पण संघाची सुरुवात खराब झाली होती. संघाने ६१ धावांत ५ विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर एमएस धोनीने (MS Dhoni) नाबाद ५० धावा केल्या आणि रविंद्र जडेजाबरोबर (Ravindra Jadeja) ७० धावांची भागीदारी रचली. जडेजाने २६ धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला २० षटकांत ५ बाद १३१ धावा धावफलकावर लावता आल्या. त्यानंतर १३२ धावांचा पाठलाग कोलकाताने १८.३ षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केला (CSK vs KKR).

या सामन्यानंतर जडेजाने चेन्नईच्या पराभवाला दव आणि नाणेफेक हरण्याला जबाबदार ठरले. तो म्हणाला, ‘दव या हंगामात महत्त्वाचा भाग असणार आहे. जर तुम्ही नाणेफेक जिंकला, तर तुम्ही पहिले गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कराल. पहिले ६-७ षटकात खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा होता, पण जसजसा डाव पुढे गेला तसे दव वाढत गेले. दवाने पुढे आपले परिणाम दाखवायलाही सुरुवात केली. आम्ही सामना शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. दवाचा विचार केला, तर सर्वांनीच चांगली गोलंदाजी केली.’

त्याचबरोबर ड्वेन ब्रावोचे देखील जडेजाने कौतुक केले. जडेजा म्हणाला, ‘जर तुम्ही या सामन्यातून काही सकारात्मक घेत असाल, तर ती गोष्ट म्हणजे ड्वेन ब्रावो. त्याने चांगला खेळ केला.’ ब्रावोने या सामन्यात ४ षटकांत २० धावांत ३ विकेट्स घेतल्या.

या सामन्यात (IPL 2022) ब्रावोव्यतिरिक्त गोलंदाजीत चेन्नईकडून मिशेल सँटेनरने १ विकेट घेतली. तसेच कोलकाताकडून उमेश यादवने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांत २० धावांत २ विकेट्स घेतल्या. त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ ५ गोष्टी सीएसकेच्या पराभवास ठरल्या जबाबदार, उद्घाटन सामन्यात केकेआरने चारली धूळ

आरसीबीच्या ‘या’ कट्टर चाहत्याचे नाही तोड, फ्रँचायझीप्रती प्रेम व्यक्त करताना केले असे काही

बांगलादेशवर १०० धावांनी विजय मिळवत इंग्लंड महिला विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये; ‘ही’ खेळाडू ‘प्लेअर ऑफ द मॅच’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---