आयपीएल २०२२ स्पर्धेचा मेगा ऑक्शन सोहळा बेंगलोरमध्ये सुरू आहे. हा सोहळा १२ आणि १३ फेब्रुवारी या दोन दिवशी पार पडणार आहे. या दोन्ही दिवशी एकूण ६०० खेळाडूंवर बोली लागणार आहे. दरम्यान या मेगा ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघांने रिटेन केलेला खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra jadeja) जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा मेगा ऑक्शन सोहळा सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज (csk )संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रवींद्र जडेजा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, “सर्वप्रथम मला खूप आनंद झाला होता की, चेन्नई सुपर किंग्ज संघाने मला त्यांच्या संघात स्थान दिले आहे. सर्वांना माहीत आहे हा किती मजबूत संघ आहे. हा संघ सुरुवातीपासून चांगली कामगिरी करतोय. तसेच माही भाई ( एमएस धोनी) सोबत खेळण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. मी जरी भारतीय संघात माही भाई सोबत होतो, तरीदेखील मला चेन्नई सुपर किंग्ज संघात स्थान मिळाल्याचा आनंद झाला होता.”
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०१२ मध्ये झालेल्या लिलावात अष्टपैलू खेळाडूला रवींद्र जडेजाला आपल्या संघात स्थान दिले होते. तेव्हापासून तो प्रत्येक हंगामात या संघासाठी मोलाची भूमिका पार पाडतोय. तसेच आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला १४ कोटी रुपयात रिटेन केले आहे. तर कर्णधार एमएस धोनीला १२ कोटी रुपयात रिटेन केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
IPL auctions:दिल्लीकर ‘शिखर’चा पंजाबच्या ताफ्यात प्रवेश, तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली






