ऑकलंड। रविवारी(26 जानेवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर नाबाद 57 धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र त्याला सामनावीर पुरस्कार देण्यावर संजय मांजरेकरांसह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार गोलंदाजाला सामनावीराचा पुरस्कार द्यायला हवा होता. कारण भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून गोलंदाजी करत न्यूझीलंडला 132 धावांवरच रोखले होते.
या सामन्यानंतर संजय मांजरेकरांनी याबदद्ल ट्विट केले, ज्यावर भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजानेही गमतीशीर उत्तर दिले.
मांजरेकरांनी ट्विट केले होते की ‘सामनावीर गोलंदाज असायला हवा होता.’ यावर प्रतिक्रिया देताना जडेजाने ट्विट केले की ‘त्या गोलंदाजाचे नाव काय? कृपया उल्लेख करा’
Player of the match should have been a bowler. #INDvNZ
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 26, 2020
What is the name of that bowler?? Pls pls mention ????
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) January 27, 2020
जडेजाच्या या प्रश्नावर मांजरेकरांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी उत्तर दिले की ‘हाहा… तू किंवा बुमराह. बुमराह, कारण त्याने गोलंदाजी केलेले 3, 10 18 आणि 20 वे षटके अत्यंत किफायतशीर ठरली.’
Ha ha…Either you or Bumrah. Bumrah, because he was extremely economical while bowling overs no 3, 10, 18 and 20. https://t.co/r2Fa4Tdnki
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 27, 2020
रविवारी झालेल्या सामन्यात भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने 4 षटके गोलंदाजी करताना 21 धावा देत 1 विकेट घेतली. तसेच जडेजाने 4 षटके गोलंदाजी करताना 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. या दोघांनीही न्यूझीलंडला 20 षटकात 5 बाद 132 धावांवर रोखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
या सामन्यात भारतीय संघाने 133 धावांचे आव्हान राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 17.3 षटकात सहज पार केले.
2019 विश्वचषकादरम्यान झाला होता मांजरेकर-जडेजामध्ये वाद –
2019 विश्वचषकादरम्यान मांजरेकरांनी ‘थोडी थोडी कामगिरी करणारा खेळाडू (बिट्स अँड पीसेस)’, असे जडेजाच्या बाबतीत बोलताना म्हटले होते. त्यावर जडेजाने ट्विट करत सडेतोड प्रतिउत्तर दिले होते.
जडेजाने ट्विट केले होते की ‘तूम्ही खेळलेल्या सामन्यांपेक्षा मी दुप्पट सामने खेळले आहेत आणि मी अजूनही खेळत आहे. ज्यांनी काहीतरी मिळवले आहे त्यांचा आदर करण्यास शिका. तूमच्या वक्तव्यांबद्दल मी खूप ऐकले आहे.’ यानंतर या दोघांच्या या वादाबद्दल बरीच चर्चा झाली होती.
कोबी ब्रायंटच्या निधनामुळे क्रीडा जगताला धक्का; कोहली, नदालसह या दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
वाचा????https://t.co/LmdgPeFnJY????#म #मराठी #KobeBryant #RIPMamba— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020
बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
वाचा????https://t.co/VCqcSZdylQ????#म #मराठी #KobeBryant #RIPMamba— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020






