विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. हा सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये खेळला जाणार आहे. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या इंट्रास्कॉड सराव सामन्यात रिषभ पंत आणि शुबमन गिलच्या तुफानी खेळीनंतर रविंद्र जडेजाने देखील दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा तुफान फटकेबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. या सराव सामन्यात एका संघात सर्व फलंदाज होते. तर दुसऱ्या संघात नियमित गोलंदाजांसह केएल राहुल, हनुमा विहारी आणि रिद्धीमान साहा होते. एकीकडे रिषभ पंतने ९४ चेंडूंमध्ये नाबाद १२१ धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केलेल्या शुबमन गिलने ८५ धावांची खेळी केली होती.
तसेच रवींद्र जडेजा देखील चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आला आहे. जडेजाने या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने अवघ्या ७६ चेंडूंमध्ये नाबाद ५४ धावांंची खेळी केली आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रवींद्र जडेजा अश्विनसोबत मिळून भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकतो. अश्विन आणि जडेजा यांची फिरकी जोडी कुठल्याही फलंदाजी क्रमाला उध्वस्त करू शकते. तसेच दोघेही शेवटी येऊन संघासाठी धावा देखील करू शकतात.
.@imjadeja gets to his half-century (54* off 76) as play on Day 3 of the intra-squad match simulation comes to end.@mdsirajofficial is amongst wickets with figures of 2/22.#TeamIndia pic.twitter.com/3tIBTGsD3L
— BCCI (@BCCI) June 13, 2021
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा विराट कोहली, आयसीसी फलंदाजांच्या यादीत ८१४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर इंग्लिश कर्णधार जो रूट चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच रिषभ पंत आणि रोहित शर्मा हे दोघेही ६ व्या क्रमांकावर आहेत. कसोटी गोलंदाजांच्या यादीत भारतीय फिरकीपटू आर अश्विन ८५० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात दमदार प्रदर्शन करत या खेळाडूंना आयसीसी कसोटी क्रमवारीत भरारी घेण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मिलरच्या किलर फलंदाजीला दुर्दैवी ब्रेक, गोलंदाजाच्या भेदक माऱ्याने १० फूट दूर उडाली दांडी
डोक्याला दुखापत झाल्याने फाफ डू प्लेसिसला ‘मेमरी लॉस’ची समस्या, स्वत: मांडली व्यथा
सॅम करनच्या भावाचा अविश्वसनीय झेल, हवेत सूर मारत एका हाताने पकडला अवघड चेंडू