क्रिकेट जगतात सर आणि रॉकस्टार नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानले जाते. जडेजाने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर अनेक सामन्यांचे निकाल बदलले आहेत.
जडेजाचे चेंडू झेलण्याचे कौशल्य आणि मैदानावरील क्षेत्ररक्षण दोन्हीही अप्रतिम आहे. तसेच फलंदाज त्याच्यापुढे धाव घेण्यापूर्वी अनेकवेळा विचार करतात. कारण जडेजाचा थ्रो थेट यष्टीला जाऊन लागतो.
असाच एक व्हिडिओ जडेजाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धचा (Mumbai Indians) सामना बरोबरीत सुटला होता.
https://www.instagram.com/tv/B_hTdzml3cp/?utm_source=ig_web_copy_link
जडेजाने शेअर केलेला हा व्हिडिओ आयपीएल २०१७मधील आहे. यादरम्यान तो गुजरात लायन्सकडून खेळत होता. मुंबईला शेवटच्या षटकातील ४ चेंडूत ४ धावा पाहिजे होत्या. बुमराहने १ चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी जडेजाने चपळाईने चेंडू पकडत नॉन-स्ट्रायकर एन्डच्या दिशेने फेकला आणि तो चेंडू थेट स्टम्पला लागला.
यानंतर मुंबईला विजयासाठी शेवटच्या १ चेंडूत १ धाव हवी असते. परंतु इरफान पठाणचा चेंडू मारण्यास मलिंगा पुन्हा चुकतो. पुढे जडेजा पुन्हा एकदा चेंडू स्टम्पवर मारतो आणि फलंदाजाला बाद करतो. अशाप्रकारे सामना बरोबरीत सुटतो. तरी सुपरओव्हरमध्ये मुंबईचा संघ हा सामना जिंकतो.
जडेजाने (Ravindra Jadeja) ३ वर्षांनंतर हा व्हिडिओ शेअर केला आहे. कारण तो या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना खास संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर जडेजा या व्हिडिओमार्फत लोकांना सांगत आहे की, घरामध्येच रहा. नाहीतर धावबाद व्हाल.
जडेजाही जामनगरमध्ये आपल्या घरात वेळ घालवत आहे. तसेच लॉकडाऊनचे (Lockdown) पालनही करत आहे. जडेजा दुसऱ्या खेळाडूंप्रमाणे सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत नाही. तर तो आपल्या घोडेस्वारीची आवड जोपासताना दिसतो.
वाचनीय लेख-
-त्यांचा स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही परंतु रोहितला मात्र त्यांनी घडवले
-रोहित शर्माकडे एकेकाळी शाळेची फी भरायलाही नव्हते पैसे, अशी भागवायचा गरज
-खेळाडू म्हणून ५ पैकी ५ आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू