आगामी आशिया चषक 2023 मध्ये भारतीय संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी होणार आहे. ही स्पर्धा वनडे विश्वचषक 2023च्या तयारीसाठी महत्वपूर्ण स्पर्धा मानली जात आहे. या वर्षी वनडे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघाने आयोजित केला आहे. यापूर्वी भारतीय संघ 2 सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. दरम्यान हा सामना इतका खास का आहे, हे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सांगितले आहे.
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) म्हणाला की, “जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन संघात सामना होतो तेव्हा दोन्ही देशांना विजयाच्या अपेक्षा जास्त असतात. मात्र, आमच्यासाठी भारताचा कोणताही सामना तितकाच महत्त्वाचा असतो. भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्यावर लोकांच्या नजरा जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.”
जडेजा पुढे म्हणाला की, “भारतीय खेळाडू आपले कार्य 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतात. आम्ही आमचा सर्वोत्तम प्रयत्न करत असतो. शेवटी हा खेळ आहे आणि दोन्ही देशांचे खेळाडू आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. माझ्या मते दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळतात. जिथे तुम्ही तुमचे 100 टक्के देण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु तुम्ही मैदानात विजयाची हमी देऊ शकत नाही.” या मुलाखतीचा व्हिडीओ स्टार स्पोर्ट्सने आपल्या आधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.
https://twitter.com/StarSportsIndia/status/1690234159661559808?s=20
भारतीय अष्टपैलू खेळाडू पुढे म्हणाला की, “तुम्हाला तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करून जिंकायचे आहे. परंतु निकाल तुमच्या बाजूने लागला नाही तर तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही फक्त तुमचे चांगली कामगिरी करू शकता आणि जिंकण्याचा प्रयत्न करू शकता.” असेही जडेजा मुलाखतीत म्हणाला.
श्रीलंकेने गेल्या वेळी यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेवर विजय मिळवला होता. स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले होते. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. पाकिस्तानने अंतीम फेरीत आपली जागा बनवली होती. मात्र, पाकिस्तानला श्रीलंकेकडून अंतीम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. (ravindra jadeja talk about india vs pakistan match)
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकपूर्वीच शुभमन गिल ठरला फ्लॉप! नको असलेले ‘रेकॉर्ड’ झाले नावावर
कुलदीपने गाजवला कॅरेबियन दौरा! भेदक गोलंदाजीने मिटवलं वर्ल्डकपचे टेन्शन