मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची खराब सुरुवात झाली आहे. त्यांनी पहिल्या सत्रातच 84 धावांत 4 विकेट्स गमावल्या होत्या. तसेच दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच 6 वी विकेटही गमावली आहे.
भारताचा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने या डावात ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा आणि मिशेल मार्शला बाद करत दोन विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये 50 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला आहे.
ख्वाजा हा जडेजाची ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटीतील 50 वी विकेट ठरला आहे. जडेजाने आत्तापर्यंत कसोटीमध्ये 187 विकेट्स घेतल्या आहेत. यातील 51 विकेट्स त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतल्या आहेत. त्यामुळे त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कसोटी विकेट्स या ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतल्या आहेत.
विशेष म्हणजे जडेजाचा ऑस्ट्रेलियन भूमीतील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 49 विकेट्स या मायदेशात घेतल्या आहेत.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जडेजा 10 व्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर माजी गोलंदाज अनिल कुंबळे आहे. त्याने 20 सामन्यात 111 विकेट्स घेतल्या आहेत.
जडेजाच्या कसोटी विकेट्स (187 विकेट्स) –
51 विकेट्स – ऑस्ट्रेलिया
45 विकेट्स – इंग्लंड
29 विकेट्स – दक्षिण आफ्रिका
23 विकेट्स – श्रीलंका
17 विकेट्स – न्यूझीलंड
10 विकेट्स – विंडीज
6 विकेट्स – बांगलादेश
6 विकेट्स – अफगाणिस्तान
महत्त्वाच्या बातम्या:
–३९ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला जसप्रीत बुमराहकडून धक्का
–टीम न्यूझीलंडची घोषणा, १० महिन्यांनी द्विशतकवीर खेळाडू करतोय पुनरागमन
–त्या एका गोष्टीसाठी रोहितला पहावी लागली ३६१ दिवस वाट