ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात केवळ 109 धावा करू शकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. मात्र दुसऱ्या गड्यासाठी उस्मान ख्वाजा व मार्नस लॅब्युशेन यांनी मोठी भागीदारी केली. परंतु, लॅब्युशेन पुन्हा एकदा रवींद्र जडेजा याचा शिकार ठरला.
इंदोर कसोटीत भारतीय संघाची फलंदाजी खराब राहिली. नॅथन लायन, मॅथ्यू कुन्हमन व टॉड मर्फी या फिरकी गोलंदाजांनी भारताचा डाव अवघ्या 109 धावांवर संपला. त्यानंतर रवींद्र जडेजा याने 12 धावांवर हेडला बाद करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेल्या मार्नस लॅब्युशेनलाही त्याने शून्यावर त्रिफळाचित केले. मात्र, तो नो बॉल असल्याने लॅब्युशेन बचावला. त्याने यानंतर ख्वाजासह 96 धावांची भागीदारी केली. मात्र, अखेरीस जडेजा यानेच त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 30 धावा केल्या.
या मालिकेचा आतापर्यंत विचार केल्यास लॅब्युशेन हा जडेजापुढे पुरता निष्प्रभ ठरला आहे. जागतिक कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या लॅब्युशेन याला जडेजाने आत्तापर्यंत मालिकेत चार वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. जडेजाने त्याला आतापर्यंत या मालिकेत 5 डावांमध्ये 125 चेंडू टाकताना केवळ 46 धावा खर्च केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील तब्बल 100 चेंडू हे निर्धाव राहिले आहेत.
स्टीव्ह स्मिथ याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात सक्षम फलंदाज म्हणून लॅब्युशेन याच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आतापर्यंत तो एकदाही मालिकेत अर्धशतक झळकावू शकला नाही. नागपूर कसोटीतील पहिल्या डावात केलेल्या 49 धावा त्याच्या सर्वोच्च ठरल्या आहेत.
(Ravindra Jadeja Took Wicket Of Marnus Labuschagne Fourth Time In Border-Gavaskar Trophy 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेम्स अँडरसनची बादशाहत अश्विनकडून उद्ध्वस्त! बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज
भारतात येऊन भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा मॅथ्यू दुसराच ऑस्ट्रेलियन, 2004मध्ये घडलेला विक्रम