इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करताना 15 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. चेन्नईच्या विजयात अष्टपैलू रवींद्र जडेजा याचे महत्त्वाचे योगदान राहिले. त्याला या कामगिरीसाठी पुरस्कार देखील मिळाले. मात्र, त्याच पुरस्कारानंतर त्याने आपल्याच चाहत्यांची टांग खिचाई केली.
जडेजासाठी हा सामना चांगला राहिला. फलंदाजीसाठी प्रतिकूल असलेल्या या खेळपट्टीवर त्याने सुरुवातीला 22 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर, गोलंदाजीमध्ये आपल्या चार षटकात केवळ 18 धावा देताना दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासाठी त्याला सामन्यात गेम चेंजर व मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर असे दोन पुरस्कार देण्यात आले.
Upstox knows but..some fans don’t 🤣🤣 pic.twitter.com/6vKVBri8IH
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 23, 2023
त्याचाच आधार घेत त्याने एक ट्विट केले. त्याने मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर पुरस्काराची ट्रॉफी स्वीकारताना चा फोटो पोस्ट करत लिहिले,
‘कंपनीला माहित आहे मात्र सीएसकेच्या चाहत्यांना नाही’ याचाच अर्थ तो चाहत्यांना सांगू इच्छित होता की, माझी किंमत या कंपनीला कळली मात्र तुम्हाला नाही.
हा एमएस धोनी याचा अखेरचा हंगाम असल्याचे समजून त्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानात येत असतात. अखेरचे दोन षटके शिल्लक असताना जडेजा फलंदाजी करत असला की, चाहते तो बाद व्हावा अशी मागणी करताना दिसतात. याबाबत दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर जडेजाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, संघ म्हणून आम्ही यशस्वी ठरत असल्याने आनंद होतो असे देखील त्याने म्हटले होते.
(Ravindra Jadeja Troll CSK Fans After Getting Most Valuable Player Award In Qualifier 1)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘खरा मित्र सुखासोबतच दुःखातही…’, सिडनीतील सभेत नरेंद्र मोदींनी काढली शेन वॉर्नची आठवण
पहिल्या Qualifierमध्ये चमकली ऋतुराज-कॉनवेची जोडी, 87 धावांच्या भागीदारीने घडवला इतिहास, वाचाच