---Advertisement---

‘जडेजा टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाचा दावा

On: शनिवार, जून 25, 2022 4:24 PM
Ravindra-Jadeja
---Advertisement---

रवींद्र जडेजाला टी२० विश्वचषकात सातत्यपूर्ण इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण जाईल, असे मत भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. अलीकडे, भारताच्या सुरुवातीच्या एकादशात कोणते खेळाडू स्थान मिळवू शकतील हा प्रश्न खूप चर्चेत आहे. मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डरबाबत अधिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांच्या अलीकडच्या कामगिरीने निवड समितीसमोरील आव्हानांमध्ये भर पडली आहे.

ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या टी२० विश्‍वचषकासाठी इरफान पठाणसह अनेक क्रिकेटपटूंनी रवींद्र जडेजाचे नाव सातव्या क्रमांकावर निवडले आहे. पण निवडकर्ते पठाणपेक्षा अक्षर पटेलला प्राधान्य देऊ शकतात, असे मांजेरकर यांचे मत आहे.

एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मांजेकर म्हणाले की, “दिनेश कार्तिकने खरोखरच दाखवून दिले आहे की तो सहा किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाज म्हणून खेळू शकतो. तो खेळावर ज्या प्रकारचा प्रभाव पाडत आहे ते आश्चर्यकारक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सामन्यात आपण हे पाहिले आहे. यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कार्तिकच्या जागी तो आल्यास जडेजाला संघात घेणे सोपे जाणार नाही. आणि कदाचित भारत अक्षर पटेलसारख्या खेळाडूला संधी देऊ शकेल.”

तो पुढे म्हणाला की, ‘हार्दिक पांड्या आणि कार्तिक या संघात खालच्या क्रमाने फलंदाजी करत आहेत. ऋषभ पंतही असेल तर जडेजासाठी ते सोपे नसेल. मात्र जडेजाच्या खेळाडूचा दर्जा लक्षात घेता निवड समितीचा त्रास कमी होणार नाही.”

दरम्यान, दुखापतीमुळे जडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळू शकला नाही. इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठीही त्याने चांगली कामगिरी केली नाही. जडेजाने केवळ १० सामने खेळले होते आणि त्यात ११६ धावा देत पाच विकेट घेतल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अक्षर पटेल फिरकी गोलंदाजी अष्टपैलू म्हणून खेळला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

रवी शास्त्रींचा प्रशिक्षक लक्ष्मणला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘त्याला’ तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, मग…

हे फक्त पंतच करू शकतो..! रिषभने स्वत:च्याच विकेटचे केले सेलिब्रेशन, जडेजाला मारली मिठी

आता खेळाडूंवर लाखो रुपये खर्च करणारे बीसीसीआय, १९८३च्या विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायचे फक्त ‘इतका’ पगार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---