---Advertisement---

‘सर रविंद्र जडेजा नको, मला फक्त..’, आपले कौतुक करणाऱ्या समालोचकाला जड्डूचे मन जिंकणारे उत्तर

Ravindra-Jadeja
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेला अखेर पूर्णविराम लावण्यात आला आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या काही दिवसांपासून आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द करण्यासाठी जोरदार मागणी केली जात होती. इतक्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मंगळवारी (४ मे ) वृद्धीमान साहाला कोरोनाची लागण झाल्यानंतर ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

स्पर्धा स्थगित करण्यात आली असली तरीही या हंगामात खेळाडूंनी केलेली कामगिरी कोणीही विसरू शकत नाही. अशातच प्रसिद्ध भारतीय समालोचकाने भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या खेळीचे कौतुक केले होते. ज्यावर रवींद्र जडेजाने दिलेला प्रतिसाद प्रचंड व्हायरल होत आहे.

या हंगामात अनेक असे खेळाडू होते, ज्यांनी आपल्या खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यात पृथ्वी शॉ, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या खेळाडूंचा समावेश होता. तसेच जडेजाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळलेली खेळी कोणीच विसरू शकत नाही. अशातच, प्रसिद्ध भारतीय समालोचक हर्षा भोगले देखील त्याचे प्रशंसक झाले आहेत.

हर्षा भोगले यांनी केली रवींद्र जडेजाचे कौतुक

रवींद्र जडेजाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळलेल्या खेळीचे कौतुक करताना हर्षा भोगले म्हणाले, “या हंगामात अष्टपैलू कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर एकच खेळाडू होता, सर रवींद्र जडेजा. त्याने शेवटच्या षटकात ३७ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर १३ धावा देत ३ गडी देखील बाद केले होते. यात ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स आणि एक उत्कृष्ट रन आऊटचा समावेश होता. एक खेळाडू जेव्हा इतक सर्व करतो,ते पाहून आश्चर्य होते. या हंगामात जर यापेक्षा चांगले प्रदर्शन कोणी केले असेल तर, मला ते पाहायला नक्की आवडेल.”

रवींद्र जडेजाने दिलेला प्रतिसाद

यात हर्षा भोगले यांनी रवींद्र जडेजाला, ‘सर रवींद्र जडेजा’ असे म्हणून संबोधित केले होते.हे जडेजाला आवडले नाही, त्याने ट्विट करत लिहिले की, “धन्यवाद हर्षा भोगले, मला आणखी आनंद झाला असता, जर तुम्ही मला फक्त रवींद्र जडेजा म्हणून संबोधित केले असते.”

महत्वाच्या बातम्या-

हीच का तुमची संवेदनशीलता? आयपीएल संघाच्या बससाठी पोलिसांनी ऍम्ब्युलन्सला थांबवले, व्हिडिओ व्हायरल

‘खत्म, टाटा, बाय-बाय’; आयपीएल २०२१चा हंगाम स्थगित झाल्याने RRच्या खेळाडूची हटके प्रतिक्रिया

आयपीएल स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतताना संघर्ष करावा लागणाऱ्या परदेशी खेळाडूंची संपूर्ण यादी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---