ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौ-यावर आहे. तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. उभय संघांमध्ये रावळपिंडी येथे झालेला पहिला कसोटी सामना कमालीचा निरस ठरला. पाच दिवसात तीन डावही पूर्ण न झाल्याने सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर आता मॅच रेफ्रींनी या खेळपट्टीचे गुणांकन केले आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात पाकिस्तानची नाचक्की झाली. (Rawalpindi Pitch)
रावळपिंडी कसोटीत श्रीलंकेचे रंजन मदुगले (Ranjan Madugale) मॅच रेफ्रीच्या भूमिकेत होते. आयसीसी एलिट रेफ्री पॅनलचे सदस्य असलेले अनुभवी रेफ्री मदुगले यांनी या कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर आपला निर्णय दिला आहे. खेळपट्टीचे रेटिंग करताना मदुगले यांनी तिचे ‘सरासरीपेक्षा वाईट’ असे वर्णन केले. आपल्या अहवालात ते म्हणाले, ‘पाच दिवसात खेळपट्टीत कोणतेही लक्षणीय बदल झाले नाहीत. कमी उसळी वगळता कोणताही बदल आढळला नाही. माझ्या मते, ही खेळपट्टी चेंडू आणि बॅटमध्ये एकसमान लढत दाखवत नाही. त्यामुळे आयसीसीची मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन मी या खेळपट्टीला सरासरीपेक्षा वाईट असे रेटिंग देतो.’
आयसीसीने केली कारवाई
मॅच रेफ्रींच्या अहवालानंतर, खेळपट्टी आणि आऊटफिल्ड निरीक्षण प्रक्रियेचा भाग म्हणून आयसीसीने या खेळपट्टीला ‘डिमेरिट’ पॉइंट दिला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, हे डिमेरिट गुण पाच वर्षांसाठी वैध आहेत. या पाच वर्षांत एखाद्या मैदानाला ५ डिमेरिट पॉइंट मिळाले तर त्या मैदानावर एक वर्षाची बंदी घालण्यात येते.
निघाल्या हजाराहून अधिक धावा
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या पहिल्या सामन्यात पाच दिवस फलंदाजांचे वर्चस्व होते. संपूर्ण सामन्यात ११८७ धावा झाल्या, तर केवळ १४ विकेट पडल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना दोन डावात केवळ चार विकेट घेता आल्या. पहिला डाव ४ बाद ४७६ धावांवर संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात बिनबाद २५२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या एकमेव डावात ४५९ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या-
Video : पाकिस्तानात चालता चालता स्विमिंग पूलमध्ये कोसळला ऑस्ट्रेलियन खेळाडू (mahasports.in)