समोवारी (17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना पाहयला मिळाला. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्सच्या नुकसानावर 226 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी संघ 8 बाद 218 धावांपर्यंत मजल मारू शकला. दोन्ही संघांनी मोठी धावसंख्या केल्यानंतर आयपीएल इतिहासातील मोठा विक्रम देखील बनला.
आयपीएल 2023 (IPL 2023) मधील हा 24वा होता. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेने 8 धावांनी विजय मिळवला. सीएसकेच्या 226 आणि आरसीबीच्या 218 धावा एकत्र केल्या, तर दोन्ही संघांची मिळून धावसंख्या 444 होते. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यांमध्या यापूर्वी कधीही दोन्ही संघांनी मिळून 444 धावा केल्या नव्हत्या. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघाच्या एकून धावसंख्येच्या बाबतीत सोमवारची सामना पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आयपीएल 2023 मध्येच आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 425 धावा केल्या होत्या. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेली ही सर्वाद मोठी धावसंख्या होती. पण समोवारी () हा विक्रम आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामन्यामुळे मोडीत निघाला.
आयपीएलमध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर केलेली सर्वात मोठी धावसंख्या (दोन्ही संघांची मिळून)
444 – आरसीबी विरुद्ध सीएसके, 2023
425 – आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 2023
422 – आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2018
415 – आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2018
412 – आरसीबी विरुद्ध सीएसके, 2018
दरम्यान, सोमवारच्या आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सीएसकेसाठी डेवॉन कॉनवे याने सर्वोत्तम प्रदर्शन केले. कॉनवेच्या 83 धावांसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. त्याचसोबत शिवम दुबे यानेही 52 धावांची ताबडतोड खेळी केली. दुसरीकडे आरसीबीसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (76) यांनी अर्धशतके ठोकली. मात्र, आरसीबीला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. सीएसकेसाठी तुषार देशपांडे याने 3, तर मथिशा पथिराना याने दोन विकेट्स घेतल्या. यो दोघांनीही शेवटच्या षटकांमध्ये सीएसकेसाठी किफायतसीर गोलंदाजी करत विजय मिळवून दिला. (RCB and CSK put together a feat that no one else could have done, history was made at the Chinnaswamy Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटसाठी धक्यावर धक्के! सीएसकेविरुद्ध पराभवनंतर आयपीएलकडून मोठी कारवाई, जाणून घ्या चूक
कॉनवे-दुबेसह ‘या’ खेळाडूंचे एमएस धोनीकडून कौतुक, आरसीबीला घरच्या मैदानावर चारली पराभवाची धूळ