आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी सगळ्यांच संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातीलच एक संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या बंगलोरच्या संघाला अद्याप आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे यंदा तरी विजेतेपद पटकावण्याच्या इर्षेने ते मैदानात उतरतील. याच कारणासाठी एक खास निर्णय बंगलोरने हंगाम सुरू होण्यापूर्वी घेतला आहे.
एका खास व्यक्तीची केली नेमणूक
सध्या कोरोना विषाणूमुळे सगळे क्रीडा सामने बायो बबल मध्ये खेळवले जात आहेत. यंदाचे आयपीएल देखील त्याला अपवाद नसेल. मात्र बायो बबल मध्ये राहणे, खेळाडूंना मानसिक दृष्ट्या आव्हानात्मक आहे. सतत बायो बबलच्या वातावरणात राहिल्याने खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याची तक्रार अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी इतक्यात केली आहे.
हीच बाब लक्षात घेऊन बंगलोरच्या संघाने आपल्या खेळाडूंसाठी पूर्णवेळ मनोचिकित्सक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध मनोचिकित्सक संजना किरन यांची या पदावर बंगलोरने नियुक्ती केली आहे. संजना किरन यांनी यापूर्वी अभिनव बिंद्रा फाऊंडेशन सह काम केले आहे. त्यांनी ऑलंपिक साठी तयारी करणार्या शूटर मनू भाकर, अंगदवीर सिंग बाजवा, तसेच ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर व चिंकी यादव या सारख्या खेळाडूंसह देखील काम केले आहे.
आता त्यांच्यासमोर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील दिग्गज खेळाडू असलेल्या विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युझवेंद्र चहल यासारख्या खेळाडूंना मानसिक रित्या फिट ठेवण्याचे आव्हान असेल. मात्र मानसिक चिकित्सकाकडून मिळणारी ही मदत बंगलोरच्या संघाला फायदेशीर ठरणार का, आणि यंदाच्या हंगामात तरी ते जेतेपद पटकावणार का, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या:
आगामी आयपीएलमध्ये हे तीन मुंबईकर उडवू शकतात भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा बनवणारे फलंदाज
असे खूप भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना विदेशी फ्रँचायझी टी२० लीगमध्ये खेळायचे आहे, या दिग्गजाचा दावा