मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात शुक्रवार रोजी (०९ एप्रिल) आयपीएल २०२१ चा पहिला सामना रंगणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. या रोमहर्षक सामन्यात सर्वांचे लक्ष आरसीबीचा युवा धुरंधर देवदत्त पड्डीकल याच्या कामगिरीवर असणार आहे. परंतु यंदा आरसीबीच्या ताफ्यात दोन नव्या धाकड सलामीवीरांची भर पडल्याने त्याचे स्थान धोक्यात आले आहे.
आयपीएल २०२० मध्ये संघनायक पड्डीकलने आरसीबीकडून डावाची सुरुवात करताना लक्षणीय कामगिरी केली होती. पूर्ण हंगामात एकूण १५ सामने खेळताना त्याने ४७३ धावा चोपल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने ५ अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे त्याचे सलामीचे स्थान यंदाही ठरल्यात जमा आहे.
परंतु भारतीय फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन आणि न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन ऍलेन यांनी नवख्या फलंदाजांनीही नुकतीच फलंदाजीत छाप सोडली आहे.
केरळचा फलंदाज अझरुद्दीन याच्याविषयी बोलताना आरसीबीचे क्रिकेट संचालक माइक हसन यांनी त्याची तोंडभरुन स्तुती केली होती. अझरुद्दीन हा केवळ गुणवंत फलंदाज नसून तो केरळ संघाचा नियमित रक्षकही असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ मध्येही उल्लेखनीय कामगिरी केली होती. मुंबईविरुद्ध ५४ चेंडूत १३७ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी राहिली होती.
दुसरीकडे नुकतेच बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा ऍलेन हादेखील चांगल्या लयीत आहे. आपल्या पदार्पणाच्या टी२० सामन्यात गोल्ड डक नोंदवणाऱ्या ऍलेनने पुढे दमदार पुनरागमन केले. त्याने पुढील २ टी२० सामन्यात मिळून ८८ धावा कुटल्या. दरम्यान २९ चेंडूत ७१ धावांची शानदार खेळी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.
त्यामुळे वरच्या फळीत अप्रतिम फलंदाजी करू शकणाऱ्या अझरुद्दीन आणि ऍलेन यांच्यापैकी एकाला संधी देण्याच्या विचारात पड्डीकलला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. अशात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली कोणाला सलामीला संधी देतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीविरुद्ध फक्त २ खणखणीत षटकार आणि पोलार्ड ठरेल ‘हा’ विक्रम करणारा दुसराच मुंबईकर
‘पन्नास खेळाडू मिळूनही पंतसारखी फलंदाजी करु शकत नाहीत,’ जगातील अव्वल गोलंदाजाने केली स्तुती






