आयपीएल 2023 स्पर्धेचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगला. सर्व क्रिकेटप्रेमींना हा सामना रंगतदार होण्याची अपेक्षा होती. मात्र, आरसीबीसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस व विराट कोहली यांनी वादळी शतकी भागीदारी करत सामना एकतर्फी बनवून टाकला. हंगामातील पहिल्याच सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवत आरसीबीने चांगली सुरुवात केली. त्याचबरोबर मुंबईला सलग अकराव्या वर्षी हंगामातील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आले.
Match 5. Royal Challengers Bangalore Won by 8 Wicket(s) https://t.co/JH4S5n5RWr #TATAIPL #RCBvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी ची संधी मिळालेल्या मुंबई इंडियन्सची आघाडीची फळी पूर्णतः अपयशी ठरली. संघाचे पहिले चार फलंदाज केवळ 48 धावांवर माघारी परतले. किशन 13 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. कॅमरून ग्रीन याला 4 चेंडूत 5 धावाच करता आल्या. कर्णधार रोहितने देखील एकच धाव केली. मुंबईने 6 षटकात 3 विकेट्स गमावत 29 धावा केल्या होत्या. त्यानंतर युवा तिलक वर्मा व नेहल वढेरा यांनी भागीदारी करत मुंबईला शंभरी पार नेले. अखेरीस तिलकने अर्शद खानसह संघाला सन्मानजनक 171 धावांपर्यंत पोहचवले. तिलकने 46 चेंडूवर नाबाद 84 धावांची खेळी केली.
विजयासाठी मिळालेल्या या धावांचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डू प्लेसिस व विराट कोहली ही अनुभवी सलामी जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिली दोन षटके आरामात खेळून काढल्यानंतर मुंबईचा गोलंदाजांवर आक्रमण केले. दोघांनी अक्षरशा षटकार चौकारांचा पाऊस पाडत वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. प्लेसिस संघाच्या 148 धावा झाल्या असताना वैयक्तिक 73 धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कार्तिकला खातेही खोलता आले नाही. अखेरीस मॅक्सवेल व विराट यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. विराटने नाबाद 82 धावांची खेळी करत संघाचा विजय साकार केला.
(RCB Beat Mumbai Indians By 8 Wickets In IPL 2023 Virat And Plessis Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त 1 धाव करूनही हिटमॅन ‘रेकॉर्ड बुक’मध्ये! सचिननंतर रोहित दुसराच
रोहित शर्माचा भीमपराक्रम! IPL 2023च्या पहिल्या सामन्यात 1 धावेवर बाद होऊनही केला ‘हा’ रेकॉर्ड