---Advertisement---

दुख दर्द पीडा! आरसीबीच्या कॅप्टनकडून मोठी चूक; विराटपुढेच म्हणाला, ‘ई साला कप नही’, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, एप्रिल 1, 2023 6:32 PM
Virat-Kohli-And-Faf-Du-Plessis
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना शुक्रवारी (दि. 31 मार्च) गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या स्पर्धेचे एकदाही विजेतेपद न मिळवणाऱ्यांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सामना रविवारी (दि. 2 एप्रिल) मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्याकडून एक चूक झाली आहे.

फाफने काय केली चूक?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे खेळाडू आणि चाहते ‘ई साला कप नामदे’ (Ee Sala Cup Namde) म्हणजेच ‘यावर्षी किताब आमचाच’ असे म्हणत असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) यालाही हेच म्हणायला सांगितले गेले. मात्र, यावेळी त्याच्याकडून मोठी चूक झाली. फाफने ‘ई साला कप नामदे’ म्हणण्याऐवजी ‘ई साला कप नही’ असे म्हटले. यावेळी जवळच्या व्यक्तींनी त्याला ‘नामदे’ या शब्दाचा वापर करण्यास सांगितला.

संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हादेखील त्याच्या शेजारीच बसला होता. फाफने चुकीचा शब्दप्रयोग करताच त्यालाही हसू आवरले नाही. विराट जोरजोरात हसू लागला. आता त्याचा यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओला आतापर्यंत 50 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर 400 हून अधिक लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1642138194488733698

एकाने कमेंट करत लिहिले की, “भावा खरं बोललास.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “फाफ भावा एवढंही खरं बोलायचं नव्हतं.” आणखी एकाने कमेंट केली की, “दुख दर्द पीडा.” अशाप्रकारे नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

फाफ डू प्लेसिस याला आयपीएल 2022 हंगामात आरसीबी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. या हंगामात आरसीबीने चांगली कामगिरी केली होती. संघ गुणतालिकेत 16 गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान झाला होता. संघाने खेळलेल्या 14 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले होते, तर 6 सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. तसेच, डू प्लेसिस याने स्पर्धेत खेळलेल्या 16 सामन्यात 468 धावा केल्या होत्या.

आता आयपीएल 2023 स्पर्धेत आरसीबी संघ आणि फाफ डू प्लेसिस कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (RCB captain Faf Du Plessis by mistake says Ee Sala Cup Nahi see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारत खूप अहंकारी…’, आयपीएल न खेळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना इम्रान खानकडून धीर
‘एवढे षटकार तर मी माझ्या आख्ख्या करिअरमध्ये…’, ऋतुराजचे सिक्स पाहून भारतीय दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---