रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने आयपीएल 2025 साठी रजत पाटीदारची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. गुरुवारी, 13 फेब्रुवारी रोजी, आरसीबीने अधिकृतपणे पाटीदारला कर्णधार म्हणून घोषित केले. कर्णधार झाल्यानंतर रजत खूप आनंदी दिसत होता. तर मग जाणून घेऊया कॅप्टन झाल्यानंतर पाटीदार काय म्हणाला.
रजत पाटीदार कर्णधार झाल्यानंतर, आरसीबीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये संघाचा नवीन कर्णधार बोलताना दिसत होता. पाटीदार म्हणाला की त्याची कर्णधारपदाची शैली थोडी वेगळी आहे.
व्हिडिओमध्ये पाटीदार म्हणाला, “नमस्कार, मी तुमचा कर्णधार रजत पाटीदार. अनेक दिग्गज खेळाडूंनी आरसीबीचे नेतृत्व केले आहे आणि त्यांनी या हंगामासाठी माझी निवड केली याचा मला सन्मान वाटतो. माझी कर्णधारपदाची पद्धत थोडी वेगळी आहे. मी अधिक शांत आहे आणि मला परिस्थितीची जाणीव आहे, काय आवश्यक आहे आणि काय नाही. मी जास्त व्यक्त होत नाही आणि दबावाच्या परिस्थितीत मी घाबरत नाही आणि ही माझी ताकद आहे.”
पाटीदार पुढे म्हणाला, “संघात अनेक अनुभवी भारतीय आणि परदेशी कर्णधार आहेत. त्यामुळे मला वाटते की त्यांचे योगदान मला कर्णधारपदाच्या भूमिकेत नक्कीच मदत करेल. गेल्या 3-4 वर्षांत आरसीबी चाहत्यांनी माझ्यावर खूप प्रेम आणि पाठिंबा दाखवला आहे याबद्दल मी खूप आभारी आहे. आरसीबीकडून खेळण्यास मी भाग्यवान आहे असे मला वाटते.”
🚨 𝗥𝗮𝗷𝗮𝘁 𝗠𝗮𝗻𝗼𝗵𝗮𝗿 𝗣𝗮𝘁𝗶𝗱𝗮𝗿 – 𝗖𝗮𝗽𝘁𝗮𝗶𝗻, 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂 🚨
The journey of self-belief. That blessed feeling. This opportunity. Hear all about it from the Man of the Hour, the calm, the balanced, and extremely likeable,… pic.twitter.com/6L5OdbmUDR
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 13, 2025
पाटीदार पुढे म्हणाला, “माझा हा प्रवास खूप चांगला राहिला आहे, त्यात खूप चढ-उतार आले आहेत. 2021 हे माझे आरसीबीसाठी पहिले वर्ष होते. त्यावेळी मला संधी मिळाली आणि त्यानंतर मेगा लिलावात माझी निवड झाली नाही, त्यामुळे मला दुसरी संधी मिळेल की नाही याबद्दल मी थोडा भावनिक होतो. मग आरसीबीने मला रिप्लेसमेंट म्हणून निवडले. मला वाटले की जर इतके काही घडले असेल तर भविष्यात काहीतरी चांगले घडणार आहे. मला दुसरी संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे.”
हेही वाचा-
कोहलीऐवजी रजत पाटीदार कर्णधार का? आरसीबीच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का
वयाच्या 25 व्या वर्षी गिलचा धमाका, रोहित शर्माच्या विक्रमाला गवसणी
RCB च्या नेतृत्वाची सूत्रे नव्या खेळाडूकडे, IPL 2025 मध्ये इतिहास घडणार?