---Advertisement---

वरुणच्या चक्रव्यूहात अडकली आरसीबी, तरीही कर्णधार कोहली खूश; म्हणाला, ‘टी२० विश्वचषकात…’

On: मंगळवार, सप्टेंबर 21, 2021 1:26 PM
---Advertisement---

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना सोमवारी राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघात पार पडला. या सामन्यात आरसीबीला केकेआरने ९ विकेट्स राखून पराभूत केले. हा सामना आरसीबीसाठी एक धडा असणार आहे. आरसीबीला आता त्यांच्या संघातील कमतरता कळाल्या आहेत. दरम्यान, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली सामना संपल्यानंतर व्यक्त झाला आहे. त्याने यावेळी विरोधी संघातील खेळाडू वरूण चक्रवर्तीचे कौतुक केले आहे.

या सामन्यात केकेआरने आंद्रे रसल (९ धावा देत ३ विकेट्स) आणि वरूण चक्रवर्ती (१३ धावा देत ३ विकेट्स) यांच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर आरसीबी संघला ९२ धावांवर सर्वबाद केले. तसेच लाॅकी फर्ग्युसननेही २४ धावा देत २ विकेट्स मिळवल्या. आरसीबीचा सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कल सोडला तर एकही फलंदाज २० धावांपेक्षा जास्त करू शकला नाही.

आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल (४८) आणि वेंकटेश अय्यर (४१ नाबाद) यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर केकेआरने सामन्यात १० षटके राखत आणि केवळ एक विकेट गमावून विजय मिळवला आहे.

सामना संपल्यानंतर कोहलीने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “चांगली भागीदारी करणे महत्वपूर्ण होते. आम्हाला एवढ्या लवकर विकेट्स गमावण्याची अपेक्षा नव्हती. एका विकेटवर ४२ धावांनंतर २० धावांच्या आसपास आम्ही पाच विकेट्स गमावले. हे डोळे उघडण्यासाखे आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच असे झाल्यामुळे आम्हाला माहित आहे की, कोणत्या क्षेत्रांमध्ये काम करायचे आहे.”

कोहलीला आगामी टी२० विश्वचषकात, जो यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला आहे; यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करायचे आहे. केकेआरच्या वरून चक्रवर्तीलाही टी२० विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सामन्यतील त्याचे प्रदर्शन पाहून विराट आनंदी झाला आहे. याबाबात विराट म्हणाला की, “वरूणने खूप चांगली गोलंदाजी केली, जेव्हा तो भारतासाठी (टी२० विश्वचषकात) खेळेल तेव्हा आमच्यासाठी महत्वाचा खेळाडू असेल. तो असा खेळाडू असेल ज्याला भविष्यात भारतासाठी खेळण्याची संधी मिळेल, हे खूप चांगले संकेत आहेत.”

कोहली या सामन्यात मिळालेल्या पराभवामुळे जास्त चिंतेत दिसत नाही. तो म्हणाला, “आम्ही आठपैकी पाच सामने जिंकले आहेत, आम्हाला काही सामन्यात पराभवाची अपेक्षा होती. हा खेळाचा भाग आहे. आपण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. आपल्या मजबूत बाजूंनी खेळावे लागेल आणि आपल्या योजनांना आमलात आणावे लागेल.”

केकेआरचा कर्णधार इयोन मोर्गननेही साम्यातील विजयानंतर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “खूप कमी वेळा असे होते, जेव्हा तुम्ही असे प्रदर्शन करता. आमच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. असे असले तरी तुम्हाला मैदानावर चांगले प्रदर्शन करायचे असते आणि आम्ही आज तसेच केले. मला नाही वाटत की खेळपट्टीत जास्त बदल आला. आरसीबीने चांगली सुरुवात केली, पण पावरप्लेच्या अंती विकेटमुळे आमच्यासाठी गोष्टी बदलल्या.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘किंग’ कोहली सोडणार आरसीबीचं ‘सिंहासन’; अमूलचे खास कॅप्शनसह लक्षवेधी कार्टून, तुम्हालाही आवडेल

मन में लड्डू फुटा!! डगआऊटमध्ये आरसीबीच्या खेळाडूचं सुरू होतं भलतचं काही, फोटो भन्नाट व्हायरल

केकेआरविरुद्धच्या मानहानीकारक पराभवाने विराटला आली जाग; म्हणाला, ‘आता माझे डोळे उघडले’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---