---Advertisement---

मन में लड्डू फुटा!! डगआऊटमध्ये आरसीबीच्या खेळाडूचं सुरू होतं भलतचं काही, फोटो भन्नाट व्हायरल

On: मंगळवार, सप्टेंबर 21, 2021 12:46 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सोमवारी (२० सप्टेंबर) रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या भेदक माऱ्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९२ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने ६० चेंडू आणि ९ गडी राखून हा सामना जिंकला आहे. सामना सुरू असताना जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाज एका पाठोपाठ एक मागे परतत होते, त्यावेळी डगआऊटमध्ये भलतेच काहीतरी सुरू होते.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका मुलीला पाहून हसताना दिसून येत आहे. याच डगआऊटमध्ये काईल जेमिसनच्या मागे विराट कोहली देखील दिसून येत आहे. परंतु विराट कोहली सामन्याची स्थिती पाहून चिंतित असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे विराट चिंतित आहे. तर त्याच्याच संघातील गोलंदाज सर्व काही विसरून त्या मुलीकडे पाहून हसताना दिसून येत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी देखील मजेशीर प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.

एका चाहत्याने हा फोटो शेअर करत लिहिले की, “ती – मला ते ३ शब्द सांग, जेमिसन- आम्ही चोकर्स आहोत.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “आरसीबीने हा सामना गमावला असला तरी देखील काईल जेमिसनने काहीतरी कमावले आहे.” तसेच आणखी एका युजरने काईल जेमिसनचा फोटो शेअर करत लिहिले की, “आपले लक्ष्य ट्रॉफी वर ठेवा.”

https://twitter.com/MSDhoniRules/status/1440001940394414084?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1440001940394414084%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fcricket%2Fipl-2021-kyle-jamieson-in-dugout-rcb-vs-kkr-flirting-royal-challengers-bangalore-social-media-reaction%2F990644

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दणदणीत विजय
या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९२ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी चांगली संघाला सुरुवात करून दिली. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना ६० चेंडू आणि ९ गडी शिल्लक असतानाच आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

केकेआरविरुद्धच्या मानहानीकारक पराभवाने विराटला आली जाग; म्हणाला, ‘आता माझे डोळे उघडले’

विराटच्या ‘द्विशतका’ला एबीने बनवले आणखी स्पेशल, दिली खास भेट; जिवलग मित्रांचा क्षण करेल भावूक

दारुण पराभवानंतरही आरसीबीचे स्थान कायम, केकेआरला मात्र भरपूर फायदा; पाहा पाँईट टेबलची सद्यस्थिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---