नुकताच इंग्लंडचा भारत दौरा संपला आहे. धाकधूक वाढवलेला अखेरचा तिसरा वनडे सामना ७ धावांनी जिंकत भारताने इंग्लंडला २-१ ने पछाडले आहे. या दौऱ्यानंतर भारत-इंग्लंडच्या क्रिकेपटूंना इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेध लागले आहे. ९ एप्रिलपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंनी आपापल्या फ्रँचायझींमध्ये सहभागी होत आहेत. मात्र भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली फ्रँचायझीशी जुडण्याऐवजी वेगळ्याच ठिकाणी पोहोचला आहे.
यंदा चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने हंगामाचा प्रारंभ होणार आहे. तत्पुर्वी २-३ दिवसांचा रिकामा कालावधी मिळाल्याने विराटने घरची रस्ता धरला आहे. तो इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका संपताच पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका यांच्यासह आपल्या राहत्या घरी पोहोचला आहे.
घराच्या बालकनीत बसलेला फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर करत सर्वांना याची माहिती दिली आहे. फोटोवर कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, घरासारखे दुसरे काहीही नसते.
ईएसपीएन क्रिकइंफोनुसार, १ एप्रिल रोजी विराट बेंगलोर संघाच्या कॅम्पसाठी रवाना होईल. विराटला वगळता फिरकीपटू युझवेंद्र चहल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे चेन्नईत दाखल झाले आहेत. एवढेच नव्हे तर, प्रतिस्पर्धी अर्थात मुंबईचे बरेच खेळाडूही पहिल्या सामन्याच्या तयारीसाठी संघाशी जोडले गेले आहेत. यात कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे.
Virat Kohli's latest picture, he is at Home. pic.twitter.com/JPxGJ0ovVF
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 29, 2021
Recent stuts on insta @imVkohli pic.twitter.com/1lvkvqnEjF
— Shamsi ( MSH) (@ShamsiHaidri) March 29, 2021
https://twitter.com/TNVIRATArmy/status/1376550802882318338?s=20
Virat Kohli reached at his home. He will join Royal Challengers Bangalore Camp on 1st April. #IPL2021 pic.twitter.com/mkkJAQYHCm
— Abhinav (@Abhicricket18) March 29, 2021
घरी असतानाही विराट आयपीएलच्या तयारीत
तत्पुर्वी भलेही विराट सध्या घरी असला तरीही तो आयपीएल तयारीच्या मनस्थितीत असल्याचे दिसून आले. तो होळीच्या दिवशीही सराव करताना दिसला. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ट्रेडमिलवर धावताना दिसताना आहे.
https://www.instagram.com/p/CM_9x1NgfRw/?utm_source=ig_web_button_share_sheet
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पहिल्या जेतेपदाची प्रतिक्षा
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बेंगलोर संघ पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग आहे. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये बेंगलोरने अंतिम फेरीत धडकही मारली होती. परंतु त्यांना तिन्हीवेळीही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गतवर्षीही दमदार कामगिरीनंतर त्यांनी प्लेऑफपर्यंत मजल मारली होती.
मात्र इलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या हातून पराभूत झाल्याने त्यांना अंतिम सामन्यापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे विजयासाठी आसुललेला बेंगलोर संघ यंदा चषक जिंकण्यासाठी अथक परिश्रम करताना दिसेल.
आयपीएलचा हा चौदावा हंगाम यावर्षी ५१ दिवसांचा असणार आहे. ९ एप्रिल ते २३ मेपर्यंत या साखळी सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफचे सामने २५ मेपासून सुरु होतील. तसेच यावर्षी आयपीएलमध्ये ११ डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील.
The moment we've all been waiting for! The fixtures for #IPL2021 are out! ????
Which RCB game are you looking forward to the most, 12th Man Army?????#PlayBold #WeAreChallengers pic.twitter.com/WXj353JQqc
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 7, 2021
असे आहेत आयपीएल २०२१ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे साखळी फेरीतील सामने-
९ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७० वाजता
१४ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल- चेन्नई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी ३.३० वाजता
२२ एप्रिल – मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – मुंबई, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दुपारी ३.३० वाजता
२७ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
३० एप्रिल – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
३ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
६ मे – अहमदाबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
१४ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – कोलकाता, राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दुपारी ३.३० वाजता
२० मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – २२ खेळाडू (८ परदेशी)
विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, हर्षल पटेल, डॅनिएल सॅम्स, काईल जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तीन, सचिन बेबी, रजत पाटिदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयश प्रभुदेसाई, कोना श्रीकर भरत
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआर आणि आरसीबी या दोन संघांसाठी आयपीएलमध्ये खेळलेले ३ दिग्गज खेळाडू
इंग्लंडचे असे ३ खेळाडू ज्यांनी आयपीएल खेळले आहे, पण तुम्हाला कदाचित त्यांच्याबद्दल माहितीही नसेल
पंजाब किंग्ससाठी आनंदाची बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला ‘हा’ खेळाडू आयपीएलसाठी सज्ज






