---Advertisement---

RCB vs PBKS: बदला पूर्ण! आरसीबीने 7 गडी राखून पंजाबला चारली धूळ! ‘हा’ ठरला टर्निंग पाॅईंट

On: रविवार, एप्रिल 20, 2025 7:24 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील 37वा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघात खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबीचा हा पाचवा विजय आहे. या सामन्यात पंजाब संघाने प्रथम खेळताना 157 धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून बंगळुरू संघाने 19व्या षटकात 7 विकेट्स शिल्लक असताना सहज लक्ष्य गाठले. आरसीबीकडून विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी अर्धशतके झळकावली. दरम्यान विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज बनला आहे. (Most Fifties in IPL Virat Kohli)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 158 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याला उत्तर देताना आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात फिल साल्ट फक्त 1 धाव करून बाद झाला, पण त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी 103 धावांची भागीदारी करत आरसीबीला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. देवदत्त पडिक्कलची खेळी आरसीबीसाठी उत्कृष्ट ठरली. त्याने मधल्या फळीत दमदार फलंदाजी केली. पडीक्कलने 35 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावा केल्या.

बगळुरूने 109 धावांवर आपली दुसरी विकेट गमावली, त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार जास्त काळ क्रीजवर राहू शकला नाही. तो 12 धावा करून बाद झाला. विराट कोहली मात्र क्रीजवर होता. त्याने 54 चेंडूत नाबाद 73 धावा करत संघाचा विजय निश्चित केला. आयपीएल 2025 मध्ये बंगळुरूचा 8 सामन्यांतील हा 5वा विजय आहे, ज्यामुळे ते आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

या सामन्याचा टर्निंग पाॅईंट म्हणजे प्रथम फलंदाजी करताना पंजाबची मधली फळी ध्वस्त झाली. मधल्या फळीत खेळताना कर्णधार श्रेयस अय्यर 6 धावा करून तंबूत परतला. तर जोश इंग्लिस 29, नेहाल वढेरा 5, शशांक सिग 31, मार्कस स्टाॅयनिस 1 धाव हे खेळाडू मधल्या फळीत आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे पंजाबचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला नाही.

आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने या सामन्यात इतिहास रचला आहे. तो आता इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. पंजाब विरुद्ध बंगळुरू सामन्यापूर्वी, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर यांनी 66 अर्धशतके केली होती. आता विराटने त्याचा 67वे अर्धशतक ठोकून हा आयपीएल रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---