---Advertisement---

RCB ने मैदान गाजवलं, IPL च्या इतिहासात दुसऱ्यांदा घडला हा विक्रम

On: रविवार, मार्च 23, 2025 3:38 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने गतविजेत्या केकेआर संघाचा दारुण पराभव केला. केकेआर संघाने प्रथम फलंदाजी करताना 174 धावांचं आव्हान उभं केलं. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 16.2 षटकात विजय मिळवला. आरसीबी संघासाठी विराट कोहलीने प्रभावी कामगिरी केली, त्याने नाबाद अर्धशतक केले. या सामन्यांमध्ये आरसीबीच्या विजयाने एक अनोखा विक्रम घडला आहे.

आरसीबी संघाने त्यांचंच रेकॉर्ड तोडलेलं आहे. आरसीबी संघाचा हा दुसरा असा विजय आहे, ज्यामध्ये खूप चेंडू शिल्लक असताना आरसीबीने विजय मिळवला आहे. याआधी आरसीबी संघाने गुजरात टायटन्स विरुद्ध 24 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला होता, हा सामना मागच्या हंगामामध्ये खेळला गेला होता. आता आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात केकेआर विरुद्ध आरसीबीने 22 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला आहे. तसेच 2021 मध्ये सुद्धा आरसीबीने 21 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला होता.

कोलकाताने बंगळूरूच्या विरुद्ध 20 षटकात 8 विकेट्स गमावून 174 धावा केल्या होत्या. यादरम्यान अजिंक्य रहाणेने चांगली पारी खेळली. त्याने 31 चेंडूत 56 धावा केल्या. तसेच सुनील नरेनने 44 धावा केल्या. नंतर धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 16.2 षटकात सामन्यांमध्ये विजय मिळवला. विराट कोहलीने 36 चेंडूंमध्ये 59 धावा केल्या, फिल साल्टने 56 धावांची महत्त्वपूर्ण पारी खेळली. रजत पाटीदारने 34 धावा केल्या, तसेच लिविंगस्टोनने नाबात 15 धावा केल्या.

आरसीबीचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. हा सामना 28 मार्च रोजी चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे, तसेच तिसरा सामना गुजरात सोबत होणार आहे . केकेआर संघाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. हा सामना 26 मार्च रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर संघाला मुंबई इंडियन्स संघाशी सामना खेळायचा आहे. तसेच हा सामना 31 मार्च रोजी होणार आहे.याचबरोबर आज आयपीएल 2025 स्पर्धेतील दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल संघामध्ये खेळला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---