---Advertisement---

रात्री 1.30 वाजता जमली एवढी गर्दी! रस्त्यावर जिकडे-तिकडे फक्त आरसीबीचेच फॅन्स, बंगळुरूनं असा साजरा केला विजयाचा आनंद

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमनं शनिवारी इतिहास रचला. आरसीबीनं घरच्या मैदानावर चेन्नईचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं. संघ प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर बंगळुरूचे चाहते खूपच आनंदी झाले होते. आरसीबीच्या विजयानंतर रात्री 1.30 वाजता बंगळुरूच्या रस्त्यांवर चाहत्यांची तुफान गर्दी जमली. स्टेडियममधून टीम बस बाहेर पडलेली पाहताच चाहत्यांचा स्वत: वरील ताबाच सुटला!

आरसीबीच्या टीमनं त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये चाहते रात्री 1.30 वाजता रस्त्यावर जमलेले दिसतायेत. टीम बसच्या आतून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलाय. बसनं स्टेडियम सोडल्यापासून दूरपर्यंत फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते रस्त्यावर दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी जमली होती. टीम बस पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

बंगळुरूच्या संघानं या व्हिडिओला एक अतिशय भावनिक कॅप्शन दिलंय. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, “सध्या रात्रीचे 1:30 वाजले आहेत. हीच गोष्ट आम्हाला खास बनवते. आमचे चाहते जगातील सर्वोत्तम चाहते आहेत आणि आम्हाला याचा अभिमान आहे.”

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं सलग 6 सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. साखळी टप्प्यातील पहिल्या 8 सामन्यांमध्ये बंगळुरूला केवळ 1 विजय मिळाला होता. संघाला सलग 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर संघानं जोरदार पुनरागमन करत पुढील 6 सामने जिंकले आणि प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं. या विजयानंतर चेन्नई आणि बंगळुरूचे प्रत्येकी 14 गुण झाले. परंतु नेट रनरेटमुळे बंगळुरूनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 218/5 धावा केल्या. नेट रनरेटच्या बाबतीत चेन्नईला मागे टाकण्यासाठी बंगळुरूला किमान 18 धावांनी विजय मिळवायचा होता. लक्ष्याचा पाठलाग करताना, चेन्नईला बंगळुरूच्या गोलंदाजांनी 191/7 पर्यंत रोखलं आणि 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनीनं हस्तांदोलन केलं नाही…विराट-अनुष्का झाले भावूक! आरसीबीच्या विजयानंतर असं होतं चिन्नास्वामीवरचं वातावरण

काय सांगता! धोनीच्या षटकारामुळे जिंकली आरसीबी, कशी ते जाणून घ्या

आरसीबीला पाठिंबा देण्यासाठी महिला संघ पोहोचला चिन्नास्वामीला, दोन महिन्यांपूर्वीच बनवलं होतं चॅम्पियन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---