आयपीएल 2023चा लिलाव 23 डिसेंबरला कोचिन येथे होणार आहे. सर्व फ्रेंचाईझींनी आपल्या रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जमा केली. बऱ्याच संघाची नजर आता नव्या खेळाडूंना संघासोबत जोडण्यावर असणार आहे. रॉसल चॅलेंजर बॅंगलोर संघाने 6 खेळाडूंना रिलिज केले होते आणि आता त्यांच्या संघात 7 स्लॉट रिकामेे आहेत, ज्यात ते दोन विदेशी खेळाडू घेऊ शकतात. आरसीबीच्या पर्समध्ये 8.75 कोटी रुपये शिल्लक आहेत. अशातच आरसीबी संघ सर्व स्लॉट भरण्यापेक्षा निवडक धाकड खेळाडूंना खेरदी करेल. आम्ही तुम्हाला अशाच तिन खेळाडूंविषयी सांगणार आहोत, ज्यांना आरसीबी लिलावात लक्ष्य करु शकते.
सॅम करन
आरसीबीचा संघ या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन (Sam Curran) याच्यावर आपला डाव खेळू शकतो. करनने क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारात लक्षणिय कामगिरी केली आहे. त्याने मागच्या महिन्यात टी20 विश्वचषक स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला आहे. तो खालच्या फळीत धमाकेदार फलंदाजी करू शकतो आणि अखेरच्या षटकांमध्ये खतरनाक गोलंदाजी देखील करू शकतो.
मनिष पांडे
मागच्या हंगामात आरसीबीला पाचव्या क्रमांकावर एक चांगल्या फंलदाजाची उणीव चांगलीच भासली होती, जो संघाचा डाव सांभाळू शकेल आणि आपल्या खेळात बदल करुन विस्फोटक शैलीत फलंदाजी देखील करु शकेल. आरसीबीच्या फलंदाजीतील ही पोकळी मनिष पांडे (Manish Pandey) पूर्ण करू शकतो. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत देखील आहे. या 33 वर्षीय फलंदाजाने आयपीएल सामन्यात 3648 धावा केल्या आहेत. या लिलावात मनिष पांडे याची आधारभू किंमत 1 कोटी रुपये इतकी आहे.
जेसन होल्डर
आरसीबीचा संघ विदेशी खेळाडूच्या स्लॉटसाठी वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर (Jason Holder) याला खरेदी करु शकतो. तो गोलंदाजी बरोबरच फलंदाजीतूनही विरोधी संघाला गोत्यात आणू शकतो. होल्डरची बेस प्राईझ 2 कोटी रुपये इतकी आहे. होल्डरने टी0 प्रकारात चांगले प्रदर्शन केले आहे. तो मागच्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता. त्याने आयपीएल 2022मध्ये 12 सामन्यांमध्ये 14 गडी बाद केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पुन्हा असे केले तर थेट घरीच’, जेव्हा संघाचे नेतृत्व करताना सचिनने खेळाडूला दिली चेतावणी
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचे चालू सामन्यात लाजीरवाणे कृत्य, चारचौघात मागावी लागली माफी