इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी रविवारी (26 नोव्हेंबर) सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी समोर आली. हार्दिक पंड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी रिलीज केलेल्या खेळाडूंचीही चांगलीच चर्चा होत आहे. आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याला रिलीज करण्यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे.
जोश हेजलवूड (Josh Hazlewood) नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचा खेळाडू ठरला. त्याने हंगामातील 11 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजयात त्याची भूमिका महत्वाची ठरली. अशात आयपीएल 2024 साठी आरसीबी त्याला संघात कायम ठेवेल, असा अंदाज सर्वजण बांधत होते. पण रविवारी आगामी हंगामासाठी आरसीबीचा संघ घोषित झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. जोश हेजलवूड याच्यासह वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल हे महत्वाचे खेळाडू आरसीबीने रिलीज केले. जाणकारांच्या मते संघासाठी हा निर्णय मोठ्या धाडसाचा आहे.
आरसीबीने खेळाडूंना रिलीज करण्याचे दाखवलेले धाडस अनेकांच्या समजू शकले नाहीये. अशातच संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी (Andy Flower) यांनी जोश हेजलवूडला संघातून कमी करण्यामागचे कारण स्पष्ट केले. फ्लॉवर यांच्या मते जोश हेजलवूड लवकरच वडील बनणार आहे, ज्यामुळे आयपीएल 2024च्या पूर्वार्धात तो संघासोबत नसेल. अशात त्याला संघात घेणे फ्रँचायझीसाठी फायदेशीर नसेल.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक फ्लॉवर म्हणाले, “मी जोश हेजलवूडशी फोनवर बोललो. त्याच्या घरी मार्चच्या शेवटी बाळ जन्माला येणार आहे. त्यामुळे आयपीएल हंगामाच्या पूर्वार्धात तो संघासाठी उपलब्ध नसेल. खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय खूप ट्रिकी असतो. आम्ही त्याचा खूप सन्मान करतो आणि संघासाठी त्याने केलेली कामगिरी महत्वाची राहिली आहे. हे निर्णय खूप महत्वाचे असतात आणि खेळाडूंच्या कारकिर्दीतवर याचा परिणाम पडत असतो. त्यामुळे मी ही जबाबदारा खूप महत्व दिले आहे.”
दरम्यान, आरसीबीने हेजलवूड, हसरंगा आणि पटेल यांच्याव्यतिरिक्त इतरही खेळाडूंना रिलीज केले. यात फिन एलन, मायकल ब्रेसवेल, डेविड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, आणि केदार जाधव यांनाही त्यांनी रिलीज केले आहे. आयपीएल 2024 साठी बीसीसीआयने डिसेंबर मिहन्यात खेळाडूंचा मिनी लिलाव आयोजित केला आहे. त्याआधी 12 डिसेंबर पर्यंत फ्रँचायझींमध्ये खेळाडूंची देवान घेवान केली जाऊ शकते. पण त्यानंतर संघात कुठाच बदल फ्रँचायझी करू शकणार नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार 19 डिसेंबर रोजी आयपीएल 2024 साठीचा लिलाव आयोजित केला जाणार आहे. (RCB head coach Andy Flower explained the reason for releasing Josh Hazlewood)
महत्वाच्या बातम्या –
“त्यादिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ…”, वर्ल्डकप फायनलच्या पराभवाविषयी शास्त्रींचे मोठे वक्तव्य
एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथन याला दुहेरी मुकुट