आयपीएल 2024 मध्ये (22 मे) रोजी एलिमिनेटर सामन्यात राजस्थाननं आरसीबीचा दारुण पराभव केला. क्वालिफायर 2 साठी शुक्रवार (24 मे) रोजी राजस्थान राॅयल्स (RR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) आमने-सामने असणार आहेत.
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) पराभवानंतर आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक एंडी फ्लावर खूप निराश झाले आहेत. आरसीबी एलिमिनेटर सामना हरल्यानंतर फ्लावर म्हणाले की, “चिन्नास्वामी स्टेडियमवर सलग टी20 सामने जिंकण्यासाठी केवळ वेग हा कधीच पुरेसा ठरणार नाही. त्यासाठी संघाला वेगवेगळे कौशल्य असलेल्या गोलंदाजांची गरज असते. जे एक वेगळी योजना तयार करु शकतात.”
आरसीबीनं या हंगामात दुसऱ्या टप्प्यात उत्तम कामगिरी केली. त्यांनी सलग सहा सामने जिंकून एलिमिनेटरसाठी क्वालीफाय केले. आरसीबीनं घरच्या मैदानावर जास्त सामने गमावले. त्यांचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (इकाॅनॉमी रेट 9.18), लॉकी फर्ग्युसन (इकाॅनॉमी रेट 10.62), यश दयाल (इकाॅनॉमी रेट 9.14), रीस टॉप्ली (इकाॅनॉमी रेट 11.20) कोणताही वेगवान गोलंदाज चिन्नास्वामी स्टेडियमवर काही खास कामगिरी करु शकला नाही. सर्वांनी आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खूप खराब कामगिरी केली.
राजस्थान राॅयल्सविरुद्ध सामना हरल्यानंतर आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक एंडी फ्लावर म्हणाले, “तुम्हाला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चांगल्या गोलंदाजाची गरज आहे. तुम्हाला हुशार, प्रतिभावान, जिद्दी खेळाडूंची गरज आहे. जे चिन्नास्वामीवर आखलेल्या योजनेनुसार कामगिरी करु शकतील. आयपीएलच्या पुढच्या लिलावात चांगल्या खेळाडूंना घेतलं पाहिजे. मी याबाबत बोलू इच्छित नाही. कारण या सामन्यात जे काही घडलं ते पचवण्याचा मी अजूनही प्रयत्न करत आहे.”
त्यानंतर ‘इम्पॅक्ट खेळाडू’ या नियमाचे समर्थन करत फ्लावर म्हणाले, “ते एका सामन्यात दोन भारतीय खेळाडूंना खेळून देतात. यात नक्कीच काहीतरी सकारात्मक गोष्टी आहेत. आता एक अतिरिक्त भारतीय खेळत आहे. ही भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगली गोष्ट आहे.”
महत्वाच्या बातम्या-
अंबाती रायडूचं आरसीबीवर वादग्रस्त विधान म्हणाला, “आक्रमक सेलिब्रेशन करून ट्राॅफी…”
पाकिस्तान कधी करणार टी20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा?
संजू सॅमसन अनुभवी शेन वॉर्नला टाकणार मागे, लिहिणार कर्णधारपदाचा नवा अध्याय..