पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीधरन श्रीराम यांना फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
श्रीराम यांनी याआधी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून काम केले आहे. तसेच भारताकडून 8 वनडे सामने खेळलेले श्रीरामने ऑस्ट्रेलिया संघाचेही फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळले आहे.
त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी ट्रेनर शंकर बासू यांची 2020 आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी स्ट्रेंथ अँन्ड कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बासू 2015 पासून 2019 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे ट्रेनर होते.
याव्यतिरिक्त आरसीबीच्या सपोर्ट स्टाफमध्ये ऍडम ग्रिफिथ यांची गोलंदाजी प्रशिक्षक, इव्हान स्पिचली यांची फिजिओ म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच मॅलोलन रंगरांजस यांची स्काउटिंग प्रमुख म्हणून आणि सौम्यादीप पायण यांची संघ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली आहे.
याबरोबरच याआधीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल 2020 साठी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना क्रिकेट कार्यकारी संचालक म्हणून तर ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सिमन कॅटिच यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या भारतीय दिग्गजाचे मोठे भाष्य, ‘धोनीने संघाबाहेर काढण्यापूर्वी सन्मानाने निवृत्ती घ्यावी’
–गौतमची कोहलीवर ‘गंभीर’ टीका, केवळ या कारणामुळे कोहली यशस्वी कर्णधार
–तो झेल पाहुन चक्क विराट कोहलीही झाला अचंबित, पहा व्हिडिओ